मोहम्मद अमीर ढोंगी बाबावर नवज्योतसिंग सिद्धू: टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत काल भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना (Ind vs Eng Semifinal T20 World Cup 2026) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या रोमांचक सामन्यात भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला. दरम्यान, भारतीय संघाने प्रवेश केल्यानंतर माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर (Mohammad Amir) याच्या भविष्यवाण्याची जोरदार खिल्ली उडवली. सिद्धू यांनी आमिरला “ढोंगी बाबा” म्हणत टोला लगावला आणि अशा गोष्टी भविष्यवाणीने नव्हे तर मैदानावरील कामगिरीने ठरतात, असे ठामपणे सांगितले.
‘मोहम्मद आमिर म्हणजे ढोंगी बाबा…’
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर (Mohammad Amir On Ind vs Eng T20 WC 2026) याने आधी भारत सेमीफायनलमध्ये पोहोचणार नाही, असे भाकीत केले होते. त्यानंतर भारत अंतिम फेरीतही जाणार नाही, असेही तो म्हणाला होता. मात्र भारताने आधी उपांत्य फेरी गाठली आणि नंतर इंग्लंडला पराभूत करून थेट अंतिम फेरीत धडक मारली.
इंग्लंडविरुद्धच्या रोमांचक सामन्यात भारताने 7 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर नवजोत सिंग सिद्धू यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओमध्ये आमिरच्या वक्तव्यांचे क्लिप्स दाखवत त्यांनी त्याची खिल्ली उडवली आणि त्याला ढोंगी बाबा असे संबोधले.
सिद्धू यांनी व्हिडिओमध्ये म्हटले की, “आपल्या शेजाऱ्यांना खोट्या भविष्यवाण्या करण्याचा फार शौक आहे. ‘बनी तो बनी, नाही तर अब्दुल घनी’, लागला तर बाण, नाहीतर तुक्का. तरीही बाबा बनून बसले आहेत. आधी म्हणाले, भारत क्वालिफाय होणार नाही, सेमीफायनलला जाणार नाही. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका पुढे जातील, असे सांगत होते.”
सिद्धू पुढे म्हणाले, “संजू सॅमसनचा कमबॅक झाला आणि दोन्ही संघ ‘गो बॅक’ झाले. म्हणून सांगतो, अशा गोष्टी भविष्यवाणीने ठरत नाहीत, त्याचे निर्णय मैदान-ए-जंगमध्ये घेतले जातात. भीक मागून कोणाला तख्तो-ताज मिळत नाही. थोथा चना बाजे घना….”
हे ही वाचा –
आणखी वाचा