मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, व
Marathi March 06, 2026 03:25 PM

भारताने उपांत्य फेरीत ७ धावांनी विजय मिळविल्यानंतर थाला: गतविजेत्या टीम इंडियाने गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या टी-20 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली. भारतानं दिलेल्या 254 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली. खासकरून मधल्या फळीतील जेकब बेथेलनं शतक झळकावलं, मात्र भारतीय संघाने शेवटच्या क्षणापर्यंत संयम राखत विजय आपल्या नावावर केला. आता अहमदाबादमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.

वानखेडेवर नेमकं काय घडलं?

टीम इंडियाच्या विजयानंतरचा जल्लोष सुरू असताना, स्टेडियममधील कॅमेरामनचे लक्ष मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरपेक्षा अधिक माजी कर्णधार एम.एस. धोनीच्या उपस्थितीवर असल्याचे दिसून आले. धोनीला स्टेडियममध्ये पाहताच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. मेहनत गौतम गंभीरची, पण चर्चा मात्र एम.एस. धोनीची… अशी प्रतिक्रिया चाहते व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियावर थाला फॉर अ रीझन ट्रेंड….

या सामन्यात मैदानावर जितका थरार होता, तितकीच एक वेगळी उत्सुकता प्रेक्षकांमध्येही पाहायला मिळाली. कारण माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी वानखेडे स्टेडियममध्ये उपस्थित होता. भारताच्या विजयासोबतच सोशल मीडियावर पुन्हा एकदा “थाला फॉर अ रीझन” हा व्हायरल फ्रेज जोरदार ट्रेंड होऊ लागला.

क्रिकेट चाहत्यांमध्ये हा फ्रेज आता एक लोकप्रिय मीम बनला आहे. धोनीच्या जर्सीवरील नंबर 7 आणि चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांमध्ये त्यांना दिल्या जाणाऱ्या थाला म्हणजेच लेडरच्या दर्जाशी याचा संबंध जोडला जातो. भारताने इंग्लंडवर नाट्यमय विजय मिळवताच अनेकांनी धोनीच्या उपस्थितीलाच या विजयाचे कारण ठरवत सोशल मीडियावर पोस्ट्सचा अक्षरशः पाऊस पाडला. “थाला फॉर अ रीझन” हा हॅशटॅग रात्रीभर ट्रेंड होत राहिला.

या विजयात आणखी एक मजेशीर योगायोग म्हणजे 7 हा आकडा. भारताने 7 बाद 253 धावा केल्या, तर इंग्लंडची टीम 7 विकेट गमावून 246 धावांपर्यंतच पोहोचली. भारताने सामना नेमक्या 7 धावांनी जिंकला. भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या संजू सॅमसनने आपल्या खेळीत 7 षटकार ठोकले. विशेष म्हणजे इंग्लंडसाठी शतक झळकावणाऱ्या जेकब बेथेलनेही 7 षटकार मारले.

धोनीच्या जर्सी क्रमांक 7 आणि थाला फॉर अ रीझन या ट्रेंडवर मागील काही वर्षांत अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत. क्रिकेटमध्ये किंवा इतर कुठल्याही संदर्भात 7 हा आकडा दिसला की चाहत्यांकडून हा फ्रेज पुन्हा चर्चेत येतो.

हे ही वाचा –

IND vs ENG T20 World Cup Semi Final :  जेव्हा वानखेडेवर बापूने इंग्रजांचा पराभव निश्चित केला; तेव्हा गौतम गंभीर खुर्ची सोडून पळत सुटला…; पाहा टर्निंग पॉइंटचा Unseen Video

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.