खोडद, ता. ६ : शिरोली बोरी (ता. जुन्नर) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेतील पाच विद्यार्थी एनएमएमएस या परीक्षेत पहिल्यांदाच उत्तीर्ण झाल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक योगेश शेळके यांनी दिली.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एनएमएमएस या शिष्यवृत्ती परीक्षेत हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रथमच या परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याने शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.
इयत्ता आठवीतील स्वरा आतकरी या विद्यार्थिनीने विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला असून श्रेया डावखर, समृद्धी खिलारी, वैभवी सोनवणे व आयुष जाधव हे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. गावातून या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. या विद्यार्थ्यांना योगेश शेळके, उषा भारती, मयूर कसाळ यांनी मार्गदर्शन केले.