Advance Tax Deadline News: भारतातील 2025-26 हे आर्थिक वर्ष आता पुढच्या काही दिवसांत संपणार आहे.मात्र हे संपत असतानाच, करदात्यांसाठी एक महत्त्वाची अंतिम तारीख जवळ येत आहे. जर तुम्हीही अशा लोकांपैकी असाल जे वर्षाला 10,000 किंवा त्यापेक्षा जास्त कर भरत असाल तर 15 मार्च ही तारीख तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. आयकर नियमांनुसार, चालू आर्थिक वर्षासाठी ॲडव्हान्स टॅक्सचा (आगाऊ कर) अंतिम हप्ता जमा करण्याची ही शेवटची तारीख आहे.
ॲडव्हान्स टॅक्स म्हणजे काय?ॲडव्हान्स टॅक्स ही सरकारने सुरू केलेली 'तुम्ही जसे कमवाल तसे पैसे द्या' अशा स्वरूपाची प्रणाली आहे. लोकांचा सामान्यतः असा समज आहे की केवळ वर्षाच्या शेवटी आयकर रिटर्न भरताना कर भरणे आवश्यक असते, परंतु तसे नाही. जर एखाद्या व्यक्तीचे एकूण कर देण्याची रक्कम (टीडीएस कपातीनंतर) ही एका वर्षात 10,000 रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर त्यांना त्यांच्या अंदाजे उत्पन्नावर 4 हप्त्यांमध्ये कर भरावा लागतो. ही व्यवस्था करदात्यांना मोठ्या प्रमाणात एकरकमी कर भरण्याच्या भारापासून दिलासा देते आणि त्यासोबतच सरकारी तिजोरीत कायम पैशांचा प्रवाह खेळता ठेवते.
Gold Rate Today: सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त! सर्वसामान्यांना मोठा दिलासा; 1 तोळा सोनं आता कितीला? पाहा आजचा ताजा भाव कुणाला ॲडव्हान्स टॅक्स भरावा लागतो?अॅडव्हान्स टॅक्सच्या या प्रणालीत केवळ मोठे व्यावसायिकच येत नाहीत, तर असे पगारदार कर्मचारीही येतात ज्यांना पगाराव्यतिरिक्त इतर स्रोतांमधूनही उत्पन्न मिळते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती नोकरी करत असताना त्याचबरोबर घरभाडे, बँकेच्या एफडीवरील व्याज किंवा शेअर बाजारातील गुंतवणुकीतून कॅपिटल गेन मिळवत असेल. अशा परिस्थितीत नियोक्ता फक्त पगारावरच TDS कापतो आणि इतर उत्पन्नावर कराची गणना होत नाही. त्यामुळे अशा अतिरिक्त उत्पन्नावर लागणारा कर स्वतः अंदाज करून अॅडव्हान्स टॅक्सच्या स्वरूपात भरावा लागतो.
ज्येष्ठ नागरिक करदात्यांना सूटआयकर नियमांनुसार ज्येष्ठ नागरिक करदात्यांना काही प्रमाणात सवलत देण्यात आली आहे. मात्र ही सवलत त्यांच्यासाठीच लागू होते ज्यांचे उत्पन्न मुख्यतः पेन्शन, घरभाडे किंवा व्याज यांसारख्या स्रोतांमधून येते. परंतु 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचा एखादा करदाता सक्रियपणे व्यवसाय करत असेल किंवा कोणत्याही व्यावसायिक सेवांमधून उत्पन्न मिळवत असेल, तर त्यालाही इतर करदात्यांप्रमाणेच ठरलेल्या वेळेत अॅडव्हान्स टॅक्सच्या हप्त्यांचा भरणा करावा लागतो.
ॲडव्हान्स टॅक्स कसा भरला जातो?आयकर विभागाने वर्षभर ॲडव्हान्स टॅक्स भरण्यासाठी एक रचना तयार केली आहे. यात करदात्यांवर आर्थिक दबाव येऊ नये म्हणून कर भरण्याची प्रक्रिया चार हप्त्यांमध्ये विभागली आहे. यात -
5 जूनपर्यंत - एकूण अंदाजे कराच्या किमान 15% रक्कम भरावी लागेल.
5 सप्टेंबरपर्यंत - मागील हप्त्यांसह एकूण कराच्या 45% रक्कम भरावी लागेल. (म्हणजेच 30%)
15 डिसेंबरपर्यंत - मागील दोन्ही हप्त्यांसह एकूण कराच्या 75% रक्कमजमा करावी लागेल.(म्हणजेच 30%)
15 मार्चपर्यंत - एकूण कराच्या 100% रक्कम पूर्णपणे भरावी लागेल.
जर तुम्ही ॲडव्हान्स टॅक्स भरण्याची अंतिम मुदत चुकवली तर तुम्हाला व्याज आणि दंड भरावा लागू शकतो. आयकर विभाग कलम 234B आणि 234C अंतर्गत व्याज आकरते. कलम 234C उशिरा हप्त्यांसाठी दंड आकारतो, तर कलम 234B तेव्हा लागू होतो जेव्हा तुम्ही 31 मार्चपर्यंत एकूण कराच्या किमान 90% रक्कम भरली नाही. दोन्ही परिस्थितींमध्ये, करदात्यांना थकबाकी भरण्यावर दरमहा 1% दराने व्याज भरावे लागते.
घरीच भरा ॲडव्हान्स टॅक्सकरदात्यांना ॲडव्हान्स टॅक्स भरण्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही.घरी बसल्या तुम्ही ही प्रक्रिया करू शकता. यासाठी -
आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलला भेट द्या आणि 'e-Pay Tax' पर्याय निवडा.
त्यानंतर, "'Challan 100" (Advance Tax) निवडा आणि तुमचे तपशील प्रविष्ट करा.
त्यानंतरचे पेमेंट हे नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा UPI द्वारे केले जाऊ शकते.
पेमेंट केल्यानंतर मिळालेली पावती किंवा चलन जपून ठेवा, कारण तुमचा आयकर रिटर्न भरताना ही माहिती देणे आवश्यक आहे.