Vedika Kabra Success Story : 'सीईईडी'मध्ये सोलापूरची वेदिका काबरा देशात दुसरी; काय आहे CEED परीक्षा?
esakal March 07, 2026 05:45 AM

सोलापूर : भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) घेतलेल्या मास्टर ऑफ डिझाईन प्रवेश परीक्षेत (सीईईडी २०२६) सोलापूरच्या वेदिका आनंद काबरा हिने भारतीय स्तरावर दुसरा क्रमांक (CEED 2026 result Vedika Kabra) मिळविला आहे.

आयआयटीप्रमाणेच एनआयडी आणि एनआयएफटी या देखील भारत सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या प्रमुख डिझाइन संस्था आहेत. संपूर्ण भारतात या तिन्ही संस्थांची मिळून ३७ पेक्षा जास्त महाविद्यालये असून गुणवंत विद्यार्थ्यांना येथे जागतिक दर्जाचे शिक्षण मिळते. भारतातील ११ आयआयटीमध्ये इंडस्ट्रिअल डिझाइन, ॲनिमेशन, मोबिलिटी अँड व्हेइकल डिझाइन, एक्सआर डिझाइन आणि स्मार्ट प्रॉडक्ट डिझाइन यांसारख्या विविध विषयांत २ वर्षांची पदव्युत्तर पदवी घेता येते.

वेदिकाने तिचे शालेय शिक्षण सोलापूरच्या महेश इंग्लिश स्कूलमधून पूर्ण केले आहे. उच्च माध्यमिक शिक्षण हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्समधून पूर्ण केले आहे. सध्या ती हैदराबाद येथील एनआयएफटीमध्ये फॅशन कम्युनिकेशनच्या अंतिम वर्षात शिकत आहे. तिला आता आयआयटी मुंबई येथे ''इंटरॅक्शन'' किंवा ''कम्युनिकेशन डिझाइन''मध्ये पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे आहे.

Jyoti Waghmare Story : आंबेडकरी चळवळ ते राज्यसभा खासदार! विडी कामगार मातेची सुकन्या कशी बनली राजकारणातील 'फायरब्रँड' नेत्या? वाचा डॉ. ज्योती वाघमारे यांची कहाणी

सध्याच्या काळात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) मुळे अनेक क्षेत्रांत बदल होत असले, तरी ''डिझाइन'' हे क्षेत्र मानवी कल्पकतेवर आधारित असल्याने अत्यंत सुरक्षित मानले जाते. यामुळेच मोठ्या प्रमाणात इंजिनिअर्सदेखील या क्षेत्राकडे वळत असून त्यांना आकर्षक पगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.

Jyoti Waghmare Success Story : आमची ज्योती आता खासदार होणार! प्रा. ज्योती वाघमारे यांच्या आई-वडिलांनी दाटलेल्या कंठाने व्यक्त केल्या भावना

वेदिकाला तिची आई अनुराधा काबरा यांचे मार्गदर्शन लाभले. अनुराधा काबरा या स्वतः एक उत्तम ''फाइन आर्टिस्ट'' आहेत. या यशात सोलापूरमधील सातरस्ता येथील बीआरडीएस संस्थेचे केंद्रप्रमुख धर्मेश टांक यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यापूर्वी सोलापूरच्या प्राची टांक, ऋतू टांक, आत्मन शाह, मोनिका कुलकर्णी आणि चारुदत्त आराध्ये या विद्यार्थ्यांनीही आयआयटीमध्ये यश मिळवले आहे. मात्र वेदिकाने ''रँक २'' मिळवून नवा इतिहास घडवला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.