'एक पोळी होळीच्या सामाजिक जाणिवेची' उपक्रमातून गरजूंना पुरणपोळी
esakal March 07, 2026 08:46 PM

‘एक पोळी होळीच्या सामाजिक जाणिवेची’ उपक्रमातून गरजूंना पुरणपोळी
जोगेश्वरी, ता. ७ (बातमीदार) : होळीच्या सणानिमित्त गरजू व बेघर नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी अलर्ट सिटीजन फोरमच्या वतीने ‘एक पोळी होळीच्या सामाजिक जाणिवेची’ हा उपक्रम यंदा सलग बाराव्या वर्षी राबविण्यात आला. विविध मंडळे, सोसायट्या व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने यंदा एकूण ४२२ पुरणपोळ्या संकलित करण्यात आल्या. या उपक्रमाला श्यामनगरचा राजा, गुरुकृपा हाउसिंग सोसायटी, ओम श्री गणेश को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, अष्टविनायक सोसायटी, मेघवाडी तसेच ज्ञानगंगा शाळेमागील मंडळ यांचे सहकार्य लाभले. संकलित पुरणपोळ्यांच्या स्वच्छतेची काळजी घेत पॅकेजिंग करून रंगपंचमीच्या दिवशी गरजू व बेघर नागरिकांना वाटप करण्यात आल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.