Anurag Dobhal brother Kalam response screenshots: बिग बॉस 17 फेम अनुराग डोभाल (Anurag Dobhal) सध्या त्याच्या व्हिडिओमुळे चर्चेत आहे. या व्हिडिओत यूट्यूबर प्रचंड डिस्टर्ब झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. या 2 तासांच्या व्हिडिओमध्ये अनुरागने कुटुंबावर छळाचा आरोप केला. त्यानं भावावरही गंभीर आरोप केले आहेत. या छळामुळे पत्नी सोडून गेली असल्याचा दावाही यूट्यूबरने केला आहे. धक्कादायक म्हणजे, त्यानं व्हिडिओतून आत्महत्या करणार असल्याचा इशाराही दिला होता. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल होताच अनुरागच्या भावानं त्याच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. यामुळे सोशल मीडियात खळबळ उडाली आहे.
अनुरागचा भाऊ कलमने व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. अनुराग खोटं बोलत असल्याचं त्यानं सांगितलं. हे सर्व व्ह्यूजसाठी सुरु असल्याचं त्यानं म्हटलं आहे. कलमने काही स्क्रिनशॉट्स शेअर केले आहेत. या स्क्रिनशॉट्समध्ये अनुरागने आपल्या मित्रासोबत चॅट केले असल्याचं दिसून आलं आहे. त्यानं आपल्या मित्रासमोर आपल्या पत्नीला मारहाण केले असल्याचं कबूल केलं.
अनुरागचे चॅट शेअर करण्यासोबतच कलमने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक नोटही शेअर केली आहे. या नोटमध्ये त्यानं लिहिले की, 'मी माझ्या शब्दांवर ठाम आहे. सगळे पुरावे माझ्या पॉडकास्ट चॅनलवर आहेत. चिल करा गाइज.. ही गोष्ट त्याच्यासाठी काही नवीन नाही. हे सगळं तो व्ह्यूजसाठी करत असतो. त्यानं एकतर्फी स्टोरी पोस्ट केली, पण त्यानं सत्य सांगितले नाही. माझ्या सर्व चाहत्यांना माझा संदेश आहे की, यात कृपया अडकू नका. त्याला नेटकऱ्यांचे आपल्याकडे लक्ष खेचून घेण्याची सवय आहे. त्यानं आमच्यावर आणि कुटुंबावर फेक केस दाखल केला आहे'.
'जेव्हा तो कायदेशीररित्या हरला, तेव्हा त्यानं हा व्हिडिओ पोस्ट केला. रितिकाने देखील त्याला याच कारणामुळे सोडले', असंही कलम आपल्या पोस्टमध्ये म्हणाला. अलिकडेच अनुराग डोभालने एक व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला. या व्हिडिओत त्यानं अश्रू ढाळत आपल्या कुटुंबावर गंभीर आरोप केले. या व्हिडिओत त्यानं नैराश्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचंही जाहीर केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
बिग बॉसमधील छोटा डॉन प्रेमात पडला? कोण आहे त्याची स्वप्नसुंदरी? तन्वीचा नाद सोडला?