नितीन चव्हाण
बीड : हायवाला कधी पावती नसते... आम्ही गेवराईचे पाटील आहोत, तुला बघून घेऊ, तुझं घर आम्हाला माहितीये! अशा फिल्मी आणि अरेरावीच्या भाषेत वाळू माफियांनी चक्क सरकारी कामात अडथळा आणून महसूल पथकालाच 'लाईव्ह' धमकी दिली. राक्षसभुवन फाट्यावर घडलेल्या या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, वाळू माफियांची दहशत आता थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली आहे.
महसूल विभागाचे तलाठी राम जाधव आणि मंडल अधिकारी दत्तात्रय शेंबडे यांचे पथक ५ मार्च रोजी दुपारी घरकुल वाळू वाटपाच्या तपासणीसाठी तैनात होते. त्याच वेळी एक पिवळ्या रंगाचा विना नंबरचा 'भारत बेंझ' हायवा ५ ब्रास अवैध वाळू घेऊन येताना दिसला. पथकाने गाडी अडवली आणि पास मागितला, पण पास तर नव्हताच, उलट तिथे 'भाईगिरी'चा थरार सुरू झाला. गाडी अडवल्याचा निरोप मिळताच स्वप्नील मोटे नावाचा व्यक्ती आपल्या ७-८ साथीदारांसह काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ आणि पांढऱ्या स्विफ्टमधून तिथे धडकला.
Premium|Badrinath Temple: गंधर्वांनी मंतरलेली पहाट; बद्रीनाथच्या प्रवासातील अलकनंदेच्या किनारी अनुभवअधिकाऱ्यांशी हुज्जत घालत त्यांनी आपला 'पाटील' असल्याचा रुबाब झाडला. आम्ही गेवराईचे पाटील, तू गेवराईत कसा येतो तेच बघतो... आमचे फोटो काढले तर तुला कायमचा संपवून टाकू, अशा शब्दांत त्यांनी तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना दम दिला. या माफियांच्या आरडाओरड आणि धमक्यांमुळे मंडल अधिकारी दत्तात्रय शेंबडे यांना मोठा मानसिक धक्का बसला. त्यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना तातडीने गेवराईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सरकारी कामात अडथळा आणत या माफियांनी चक्क ५ ब्रास वाळूचा हायवा तिथून पळवून नेला. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदार गेवराई यांच्या आदेशाने आता आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BSS) २०२३ च्या विविध कलमांखाली आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्कॉर्पिओ आणि स्विफ्टमधून उतरली 'पाटील' गँग!गाडी अडवल्याचा निरोप मिळताच स्वप्नील मोटे नावाचा व्यक्ती आपल्या ७-८ साथीदारांसह काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ आणि पांढऱ्या स्विफ्टमधून तिथे धडकला. अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत त्यांनी आपला 'पाटील' असल्याचा रुबाब झाडला. "आम्ही गेवराईचे पाटील, तू गेवराईत कसा येतो तेच बघतो... आमचे फोटो काढले तर तुला कायमचा संपवून टाकू," अशा शब्दांत त्यांनी तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना दम दिला.