Marathi Rashi Bhavishya : ज्योतिषशास्त्रानुसार येत्या काळात खूप महत्त्वपूर्ण बदल ग्रह आणि राशींमध्ये होणार आहे. 13 मार्चला शनी ग्रहाचा मीन राशीत अस्त होणार आहे. 22 एप्रिलपर्यंत म्हणजे तब्बल 40 दिवस शनी अस्त अवस्थेत असेल. शनीची शक्ती कमी झाल्यामुळे काही राशींच्या अडचणी कमी होणार आहेत.
शनिदेवाच्या बदललेल्या चालीचा परिणाम सगळ्या देशभरात पाहायला मिळतो. हा शनी अस्त काही राशींना शुभ किंवा अशुभ ठरणार आहे. कोणत्या राशींना मिळणार आहे शुभ परिणाम जाणून घेऊया.
मेष रास :
मेष राशीच्या कुंडलीत बाराव्या स्थानात हा अस्त होणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. साडेसातीचा पहिला टप्पा सुरु असल्याने थोडं सावध राहा. पण या काळात तुमच्या चिंता दूर होतील.
वृश्चिक रास :
वृश्चिक राशीच्या पाचव्या स्थानात हा अस्त होणार आहे. त्यामुळे करिअर आणि व्यवसायात सकारात्मक परिणाम दिसून येईल. नोकरीत प्रोमोशन मिळेल.
कुंभ रास :
कुंभ राशीच्या दुसऱ्या स्थानात शनी अस्त होणार आहे. या काळात उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु असल्यामुळे प्रभाव कमी असेल.
मीन रास :
मीन राशीच्या कुंडलीत पहिल्याच भावात शनी अस्त होणार आहे. यामुळे तुमच्या बिझनेसवर सकारात्मक परिणाम दिसून येईल. अडचणी दूर होतील. अडकलेली कां पूर्ण होतील. आर्थिक स्थिती सुधारेल.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.