कमाईच्या बाबतीत अभिनेत्री ऐश्वर्या राय तिचा पती अभिषेक बच्चनच्या पुढे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्याची एकूण संपत्ती जवळपास 900 कोटी रुपये आहे. तर अभिषेकची संपत्ती 200 ते 280 कोटी रुपयांदरम्यान आहे. ब्रँड एंडोर्समेंटमधून ऐश्वर्याची सर्वाधिक कमाई होत आहे.
अभिनेत्री आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने गंगुबाई काठियावाडी, डिअर जिंदगी, उडता पंजाब, हायवे यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. आलिया जवळपास 550 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. तर रणबीरची संपत्ती सुमारे 345 कोटी रुपये इतकी आहे.
अभिनेत्री दीपिका पादुकोण ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 2022 मध्ये तिने तिचा स्कीनकेअर ब्रँडसुद्धा लाँच केला होता. दीपिकाची एकूण संपत्ती 500 कोटींच्या घरात, तर तिचा पती आणि अभिनेता रणवीर सिंहची संपत्ती 400 कोटींच्या घरात आहे.
अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्यातील संपत्तीत बराच फरक आहे. कतरिना जवळपास 250 ते 263 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे, तर विकीकडे फक्त 41 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 'के ब्युटी' या स्कीनकेअर ब्रँडमधून कतरिनाची चांगली कमाई होते.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या कमाईतही खूप मोठा फरक आहे. सोनाक्षीने 'दबंग'पासून करिअरची सुरुवात केली. तर झहीरला फिल्म इंडस्ट्रीत फारसं यश मिळालं नाही. 'एशिया नेट'च्या रिपोर्टनुसार, सोनाक्षीची एकूण संपत्ती 100 कोटींच्या आसपास आहे. तर झहीर इक्बालकडे फक्त 1 ते 2 कोटी रुपयांची संपत्ती आहे.