पिंपळवंडी, ता. १० : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कांदळी (ता. जुन्नर) येथे रविवारी (ता. ८) महिलांसाठी भव्य हळदी- कुंकू व सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे यांच्या निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमात सुमारे ३८५ महिलांनी उपस्थिती लावून महिला दिन साजरा केला.
यावेळी अभय वारुळे यांच्या ‘न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणी’चा या स्पर्धेत १३० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या खेळात महिलांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले. या कार्यक्रमात प्रथम क्रमांकाची सोन्याची नथ व पैठणीचा मान सारिका प्रणीत बढे या महिलेने पटकाविला. द्वितीय क्रमांक कुलर व पैठणी शुभांगी आशिष घाडगे, तृतीय क्रमांक मिक्सर व पैठणी अर्चना सुभाष शेंडे, चतुर्थ क्रमांक कुकर व पैठणी सीमा संतोष घाडगे, तर पाचव्या क्रमांकासाठी असणारे डिनर सेट व पैठणी अरुंधती महेंद्र बढे यांना मिळाले. यामध्ये चंद्रभागा मुक्ता बढे व सुंदराबाई गणपत काळे यांनी सहभाग घेतला. उपस्थित महिलांमधून ११ भाग्यवान महिलांना निर्मला बढे, सुनीता बढे, उन्नती बढे, ऋतुजा बढे, वनिता बढे, अनिता बढे यांच्या हस्ते पैठणी देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त सदस्य कल्पना वैभव काळे, जयश्री ज्ञानेश्वर खंडागळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी सरपंच बाळासाहेब बढे, उद्योजक संदीप बढे, जिल्हा परिषद सदस्य मंगेश काकडे, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बढे, तान्हाजी बढे, माजी उपसरपंच नारायण भोर, सुदर्शन बढे, अनिल भोर, ग्रामपंचायत सदस्य नीलेश बढे, महेश बढे, विश्वास बढे, योगेश बढे, दिनेश कुतळ, शिवशंकर मांडे, दयानंद बढे, अक्षय बढे, प्रसाद घाडगे, शुभम बढे, दिनेश बढे, गणेश भोर, संतोष बढे, महेश बढे, नवनाथ नेंद्रे, अशोक जगताप, सोमनाथ कुतळ, संपत बढे, संकेत बढे, यश बढे, तेजस बढे, विघ्नेश बढे, स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जागतिक महिला दिनानिमित्त बाळासाहेब बढे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाबद्दल उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केले. युवा उद्योजक सौरभ बढे व सिद्धेश बढे यांनी आभार मानले.
02819