पान ६ थोडक्यात
esakal March 10, 2026 09:45 PM

महिला दिनानिमित्त हळदीकुंकू समारंभ
सरळगाव, ता. १० (बातमीदार) : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मुरबाड शहरातील सामाजिक कार्यकर्त्या संगीता साबळे यांच्या वतीने हळदीकुंकू समारंभ घेण्यात आला. तोंडलीकर नगर, शहर परिसरातील ८०० ते हजार महिलांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून पैठणी बक्षीस ठेवण्यात आली होती. मानाच्या तीन पैठण्यांसह उत्तेजनार्थ दहा पैठण्यांचे बक्षीस देण्यात आले. लकी ड्रॉमध्ये मनीषा भुरे, प्रीती आगिवले आणि निकिता कथोरे या तीन महिला मानाच्या पैठणीच्या विजेत्या ठरल्या. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महिलांचा सत्कारही करण्यात आला. अशा प्रकारचे कार्यक्रम महिलांमध्ये संवाद आणि एकोपा वाढवण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला मुरबाड नगर पंचायतीच्या नगरसेविका मधुरा सासे, कुणबी समाजोन्नती मंडळाच्या उपाध्यक्षा ज्योती गोडांबे, ललिता कथोरे, ॲड. वैशाली घरत यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

----------------------------

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.