ब्राह्मण मंडळ रोहा तर्फे महिला दिन उत्साहात साजरा
esakal March 10, 2026 10:46 PM

ब्राह्मण मंडळ रोहा तर्फे महिला दिन उत्साहात साजरा

रोहा ता.९ ( बातमीदार ) : ब्राह्मण मंडळ रोहा तर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रविवार (ता.८मार्च) रोजी श्री ओंकारेश्वर मंदिर येथे विविध उपक्रम संपन्न झाले. यावेळी पवई -मुंबई येथील सुप्रसिद्ध व्याख्यात्या तसेच प्रतिथयश साहित्यिक सौ. चैत्राली जोगळेकर यांचे ''आयुष्य जगा भरभरून'' या महिलांच्या अत्यंत जिव्हाळाच्या विषयावरील व्याख्यान महिलांना एक नवीन बूस्टर देऊन गेले. सौ. चैत्राली जोगळेकर यांनी खुमासदार शैलीमध्ये आयुष्याचे मर्म उपस्थित महिलांना उलगडून सांगितले.
यावेळी ब्राह्मण मंडळ रोहा तर्फे साहित्यिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या ब्राह्मण समाजातील सौ.अचला धारप, सौ. आरती धारप, सौ.मानसी चापेकर,सौ.सायली जोगळेकर यांचा सौ.चैत्राली जोगळेकर यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
या प्रित्यर्थ महिलांसाठी घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली त्याचे परीक्षण सौ.सुमेधा आठवले व सुवर्णा खेर्डे यांनी केले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी ब्राह्मण मंडळ अध्यक्ष अमित आठवले, सचिव निखिल दाते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी सदस्या सौ. स्वाती पेंडसे, स्मृती जोशी,राजश्री आठवले व महिला कमिटीने विशेष परिश्रम घेतले.

फोटो कॅप्शन : महिलांचा सन्मान करताना सौ. अरुणा दाते व अन्य महिला मान्यवर

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.