'महापौर सहाय्यता निधी'त जमा करणार
esakal March 10, 2026 10:46 PM

पनवेल, ता. १० (बातमीदार) : महापौर नितीन जयराम पाटील यांनी समाजाभिमुख निर्णय घेत आपले सर्व मानधन व भत्ते ‘महापौर सहाय्यता निधी’मध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल महापालिकेचे नगरसचिवांना पत्र पाठवून आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महापौरांना दरमहा मानधन, बैठकीचे भत्ते, तसेच स्वीय सहाय्यकाचे मानधन व वाहनभत्ता मिळतो. मात्र समाजातील गरजू नागरिकांना मदत व्हावी आणि आरोग्यविषयक अडचणींना सामोरे जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने महापौर नितीन पाटील यांनी हे सर्व मानधन व भत्ते ‘महापौर सहाय्यता निधी’मध्ये जमा करण्याचा निर्णय घेतल्याचे पत्रात नमूद केले आहे. यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचेही त्यांनी निर्देश दिले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.