Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी
esakal March 11, 2026 02:45 AM

जाफराबाद - जाफराबादहून घराकडे जाणाऱ्या दुचाकी स्वराला मिक्सरने धडक दिल्याने बाप लेक जागीच ठार झाले तर एक चिमुकला मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.१०) रात्री आठ वाजेच्या दरम्यान खामखेडा फाट्यादरम्यान घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की कुंभारझरी (ता. जाफराबाद) येथील विनोद उत्तम चव्हाण हे आपल्या दोन मुलांसह जाफराबाद दुचाकीने गावाकडे येत असताना खामखेडा पाठीजवळ टेंभुर्णीहून जाफराबाद कडे जाणाऱ्या मिक्सरने त्यांना जोराची धडक दिली.

यामध्ये विनोद उत्तम चव्हाण (वय-35 वर्ष ) युवराज विनोद चव्हाण (वय-8 वर्ष ) यांचा जागेवरच मृत्यू झाला तर शौर्य विनोद चव्हाण (वय-वर्ष 10) हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने जालना पाठवले.

दरम्यान दोन्ही मयतांना जाफराबाद येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद टेंभुर्णी पोलीस स्टेशनला घेण्यात आली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.