दारात अंत्यविधीसाठी नातेवाईक जमले, स्मशानभूमीतलीही तयारी पूर्ण; रूग्णवाहिका खड्ड्यात आदळली अन् ब्रेन डेड महिला जिवंत झाली
विशाल देवकर March 11, 2026 05:43 PM

Uttar Pradesh Accident News : उत्तर प्रदेशातील पिलीभीत (Pilibhit) जिल्ह्यातून एक अशी घटना समोर आली आहे जी तुम्हालाही थक्क करेल. यात डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केलेल्या आणि घरी अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झालेल्या एक महिला चमत्कारिकरित्या मृत्यूच्या दारातून परत आली. ही घटना उत्तर प्रदेशातील पिलीभीत गोकुलपुरम कॉलनीत घडली. तिथल्या रहिवासी विनिता शुक्ला या 22 फेब्रुवारी रोजी अचानक घरी कोसळल्या. त्यांनतर त्यांना कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात नेले, तेथून त्यांना बरेलीतील एका खाजगी रुग्णालयात रेफर करण्यात आले. (Uttar Pradesh News)

दरम्यान, विनीता यांना बरेली रुग्णालयात दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे शरीर गतिहीन होते, त्यांच्या डोळ्यांच्या बुबुळाच्या कान्या पसरल्या होत्या आणि त्या मेंदूत मृतावस्थेत होत्या. डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबाला स्पष्टपणे सांगितले की जर व्हेंटिलेटर काढला तर त्यांचे प्राण जाईल. जड अंतःकरणाने कुटुंब त्यांना शेवटी पर्याय नसल्याने घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेत बसले.

Pilibhit News : अंत्यविधीसाठी घरी नातेवाईक जमले, स्मशानभूमीत तयारी पूर्ण, पण..

दरम्यान, 24 फेब्रुवारी रोजी जेव्हा विनीता यांना रुग्णवाहिकेतून घरी आणले जात होते, तेव्हा घरातील वातावरण शोकाकुल झाले होते. अंत्यसंस्कारासाठी लाकडांची व्यवस्था करण्यात आली होती आणि नातेवाईक आणि शेजारी त्यांना निरोप देण्यासाठी दाराशी जमले होते. पण नंतर निसर्गाने अद्भुत आणि विश्वसनीय अशी घटना समोर आणली.

Pilibhit Accident News :रुग्णवाहिकेत धक्का बसला अन् क्षणात....

अतिशय दुःखात कुटुंबीय घराच्या वाटेने निघाले असता अचानक एक खड्डामध्ये आला आणि रुग्णवाहिका त्यातून जोरात उसळली. या झटक्याने विनीता यांना अचानक एक तीव्र धक्का जाणवला. खड्ड्यामुळे रुग्णवाहिका हलली, ज्यामुळे विनीतालाही धक्का जाणवला. कुटुंबीयांना हे लक्षात आल्यावर, त्या शुद्धीवर आल्या. या चमत्कारिकरित्या घडलेल्या घटनेनंतर त्यांना स्मशानभूमीत नेण्याऐवजी, कुटुंबीयांनी त्यांना ताबडतोब पिलीभीत येथील डॉ. राकेश न्यूरो सिटी रुग्णालयात नेले. 14 दिवसांच्या सखोल उपचारानंतर, विनीताच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. आता, त्या बऱ्या असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Accident News : डॉक्टरांनी सांगितले की...

न्यूरो सिटी हॉस्पिटलचे डॉ. राकेश सिंग म्हणाले की, महिलेच्या मेंदूच्या मृत्यूनंतर कुटुंबाने अंत्यसंस्काराची सर्व तयारी आधीच केली होती. जेव्हा रुग्णाला अचानक शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी तिला माझ्याकडे आणले. मलाही त्याची अपेक्षा नव्हती, कारण तिचे हातपाय आणि डोळ्याच्या बाहुल्या पसरल्या होत्या. कुटुंबाच्या विनंतीनुसार मी महिलेला दाखल केले. ही देवाची इच्छा होती आणि रुग्णाच्या कुटुंबाने तिच्यावर विश्वास ठेवला, ज्यामुळे तिचा जीव वाचला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.