IPL 2026 : 19 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या टप्प्यात 20 सामने! पहिली मॅच कधी? जाणून घ्या
Tv9 Marathi March 11, 2026 10:45 PM

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार 1 महिना रंगला. क्रिकेट चाहत्यांना 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान 20 संघामध्ये 50 पेक्षा अधिक सामने पाहायला मिळाले. टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर मात करत वर्ल्ड कप आपल्या नावावर केला. त्यानंतर आता काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जगातील सर्वात मोठ्या टी 20i लीग स्पर्धेला सुरुवात होणार आहे. जगातील सर्वात श्रीमंत टी 20i लीग असा लौकीक असणाऱ्या आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

टीव्ही9 हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, 19 व्या मोसमातील संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही. या स्पर्धेला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यानुसार 28 मार्च चे 12 एप्रिल पर्यंतच्या सामन्यांच वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. मोसमातील सलामीचा सामना हा गतविजेता रॉयल चँलेजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. तसेच विविध 4 राज्यातील विधानसभा निवडणुकींमुळे संपूर्ण हंगामाचं वेळापत्रक जाहीर करण्याऐवजी निवड सामन्यांच्याच तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

19 व्या मोसमातील पहिल्या फेरीच वेळापत्रक जाहीर

🚨 News 🚨

Presenting the schedule for the first 20 matches of #TATAIPL 2026, to be played from March 28 to April 12, 2026 🗓️

Full schedule will be announced once poll dates are announced for three states set to undergo State Assembly elections.

More details ▶️… pic.twitter.com/8Iq492v8TE

— IndianPremierLeague (@IPL)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.