Cricket : भारत-ऑस्ट्रेलिया टेस्टनंतर विंडीज दौऱ्यासाठी टीम जाहीर, पहिला सामना कधी?
GH News March 12, 2026 02:12 AM

हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वुमन्स टीम इंडियाने 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 2-1 ने विजय मिळवून ऑस्ट्रेलिया दौऱ्याची विजयी सुरुवात केली. वुमन्स टीम इंडियाची ऑस्ट्रेलियात कोणतीही आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. मात्र त्यानंतर यजमान ऑस्ट्रेलिया महिला संघाने जोरदार कमबॅक केलं. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा 3-0 ने धुव्वा उडवला. त्यामुळे टीम इंडिया हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात एकमेव कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट विजयाने करणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष होतं. मात्र टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट करण्यात अपयशी ठरली.

यजमान ऑस्ट्रेलिया वूमन्स क्रिकेट टीम मायदेशातील या मालिकेनंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया या दौऱ्यात वेस्ट इंडिज विरुद्ध 19 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली आहे. सोफी मोलिनेक्स ही टी 20i आणि एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यातील टी 20i आणि वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया टीम : सोफी मोलिनेक्स (कॅप्टन),डार्सी ब्राउन, निकोला कॅरी, ऐश गार्डनर, किम गर्थ, लुसी हॅमिल्टन, अलाना किंग, फोबे लिचफील्ड, ताहलिया मॅकग्राथ, बेथ मूनी, एलीस पेरी, मेगन शट, जॉर्जिया वोल, जॉर्जिया वेयरहम आणि ताहलिया विल्सन.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.