होर्मुज खाडीत भयंकर घडतंय, अमेरिकेने सुरू केला खेळ, धक्कादायक माहिती, थेट उतरवले…
GH News March 20, 2026 02:11 PM

अमेरिका आणि इराण युद्धाला 20 दिवस पूर्ण झाली. मात्र, या 20 दिवसांमध्ये जगातील अनेक देश जैरीस आलेत. इराणकडून थेट होर्मुज खाडी बंद ठेवण्यात आली. होर्मुज खाडी सुरू करण्याकरिता अमेरिकेकडून अनेक प्रयत्न केली जात आहेत. अमेरिकेच्या युद्धनाैकाही इराणच्या जवळ उभ्या होत्या. मात्र, होर्मुज खाडीत उतरण्याची अमेरिकेची हिमत झाली नाही. शेवटी इराणपासून दूर युद्धनाैका नेण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला. होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता अमेरिकेकडून प्रामाणिक प्रयत्न करण्यात आले. मात्र, अमेरिकेला कोणत्याही देशाची साथ मिळाली नाही. अनेक देशांकडे अमेरिकेने मदत मागितली. मात्र, एकही देश होर्मुजमध्ये आपली युद्धनाैका पाठवण्यात तयार नाही. यासोबतचे जमिनीवरील युद्ध समुद्राकडे वळले. तिथे इराण खंबीरपणे उभा असल्याचे लक्षात येताच आता हे युद्ध तेल रिफायनरी आणि गॅस प्रकल्पांकडे वळले. मोठे हल्ले गॅस प्रकल्प आणि तेल रिफायनरीवर केले जात आहेत. इराणसोबतच्या युद्धात अमेरिका मोठ्या कोंडीत सापडली आहे.

अमेरिकेचा अत्यंत जवळचा मित्र असलेल्या कतारला मोठा घाव इराणकडून देण्यात आला. कतारच्या गॅस प्रकल्पावर इराणकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात इतके मोठे नुकसान झाले की, पुढील 5 वर्ष सर्वकाही व्यवस्थित करण्यास लागणार आहे, याबद्दल स्वत: कतारकडून माहिती देण्यात आली. होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता अमेरिकेकडून अजूनही प्रयत्न केली जात आहेत. मात्र, अमेरिकेला अपयश मिळताना दिसत नाही.

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेने आतापर्यंत अरबो डॉलरचे नुकसान करून घेतले आहे. मात्र, अजूनही होर्मुज खाडी सुरक्षित करण्यात त्यांना यश मिळाले नाही. खरे युद्ध तर अजूनही शिल्लक आहे. होर्मुज खाडीतून एकही जहाज जात नाहीये. फक्त काही काही देशांचे जहाज इराणच्या लष्कराकडून सोडली जात आहेत, त्यापैकी भारत एक आहे. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, इराणी ड्रोन रोखण्याकरिता अमेरिकेकडून यूएस अपाचे काही हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली. यासोबतच अमेरिकन फायटर विमाने कमी उंचीवरून नाैसैनिक ठिकाणांवर हल्ले करत आहेत.

अगोदर अमेरिकेकडून इराणी मिसाईलच्या ठिकाणांना टार्गेट करण्यात आले. अमेरिकेकडून दावा करण्यात आला की, इराणी मिसाईल असलेल्या ठिकाणांवर 5000 पाऊंट पेक्षा जास्त बॉम्ब टाकण्यात आली. अमेरिकेच्या मते याठिकाणी इराणी एंटी शिप क्रूझ मिसाईल समुद्री व्यापाराला धोका होता, तिथे आम्ही हमला केला. मात्र, असे असले तरीही अमेरिकेला होर्मुज मार्ग ताब्यात घेण्यात आला नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.