राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी अशोक खरातच्या पाद्यपूजेचा व्हिडीओ समोर आला. तसेच अशोक खरात आणि रुपाली चाकणकर (Ashok Kharat And Rupali Chakankar) यांचे विविध कार्यक्रमातील फोटोही समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याचदरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत.
2 सप्टेंबर 2024 ला रोजी सोमवती अमावस्येला स्वत:ची अनामिका कापली होती. एका पीडितेने सांगितलं की रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करत होत्या, असा धक्कादायक आरोप सुषमा अंधारे यांनी केला. तसेच अनामिका कापल्यानंतर रुपाली चाकणकर यांचे फोटो दाखवले. या फोटोमध्ये रुपाली चाकणकरांच्या अनामिकाला बँडेंज लावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रुपाली चाकणकरांना अटक करुन त्यांची नार्को चाचणी करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे घरगुती संबंध आहेत. खरातच्या मुलीच्या लग्नाला चाकणकर होत्या. चाकणकरांचा घरात खरात यांची भाची राहते, असा दावाही सुषमा अंधारे यांनी केला. (Sushma Andhare On Rupali Chakankar Ashok Kharat Case)
रुपाली चाकणकरांना तातडीने अटक करा, रुपाली चाकणकरांची समोरासमोर चौकशी झाली पाहिजे. चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, अनेक महिलांचे लैंगिक शोषण झालं आहे. चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, हे सगळ करण्याअगोदर त्यांना त्या पदावरून काढलं पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली. रूपाली चाकणकर फरार होण्याअगोदर त्यांचा राजकीय दबाव वापरू शकतात. त्यांनी आपल्या पदाचा दुर्गोपयोग करत अनेकांवर दबाव आणला. काही पीडित म्हणतात, चाकणकर आम्हाला रात्री 2-2 वाजता धमकी देत होत्या. चाकणकर आणि कॅप्टन खरात यांच कोणत्यावेळी काय बोलण झालं हे समोर येण गरजेचं आहे. खरातने काही लोकांची मदत मागितली का? हे समोर येणं गरजेचं आहे, असं सुषमा अंधारेंनी सांगितलं.
अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape news) केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. 'शिवनिका ट्रस्ट'च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याची शक्यता आहे. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरिता करायचे उपाय आदीच्या निमित्ताने अशोक खरातच्या संपर्कात असतात.