प्रसिद्ध उद्योगपतीचा अपघात; रुग्णालयात तातडीने उपचार सुरू
Saam TV March 21, 2026 06:45 AM

उद्योगपती गौतम सिंघानिया यांचा अपघात झालाय

अपघातात किरकोळ जखमी झालेत

त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती हाती आलीये

संजय गडदे, साम टीव्ही

प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात ते किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया हे मालदिवमध्ये एका अपघातात किरकोळ जखमी झाल्याची माहिती त्यांच्या प्रवक्त्यांनी दिली. अपघात झाल्यानंतर तातडीने त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर मुंबईत योग्य वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबई-पुणे हायवेवर अपघाताचा थरार; IIT मुंबईच्या ३ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

रुग्णालयात दाखल केलेल्या गौतम सिंघानिया यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर अनेकांनी त्यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांसाठी सिंघानिया यांच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत. तसेच या अपघातात प्रभावित झालेल्या इतर व्यक्तींच्या प्रकृतीसाठीही प्रार्थना करण्यात आलीये.

कोण आहेत गौतम सिंघानिया?

उद्योगपती गौतम सिंघानिया हे रेमंड ग्रुपचे चेअरमेन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांचे इतर क्षेत्रातही उद्योग आहेत. ते दक्षिण मुंबईत 'जे के हाऊस'मध्ये वास्तव्यास आहेत.

गौतम सिंघानिया कोण आहेत?

गौतम सिंघानिया हे रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आहेत. तसेच ते प्रसिद्ध उद्योगपती आहेत.

सिंघानिया यांचा अपघात कुठे झाला?

सिंघानिया यांचा अपघात मालदिवमध्ये झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.