प्रसिद्ध उद्योगपतीची स्पीडबोट समुद्रात उलटली; चार जण बुडाले
Saam TV March 21, 2026 12:45 PM

उद्योगपती गौतम सिंघानिया यांचा अपघात झालाय

अपघातात किरकोळ जखमी झालेत

त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती हाती आलीये

संजय गडदे, साम टीव्ही

प्रसिद्ध उद्योगपती रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया यांचा मालदीवमध्ये अपघात झाला आहे. स्पीडबोट उलटल्याने अपघात झाला असून त्यात ते जखमी झाले आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करण्यात आले आहेत.

सिंघानिया यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी मालदीवमधील वेलिधूजवळ पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीडबोट उलटली. त्या अपघातात प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया हे किरकोळ जखमी झालेत. अपघात झाल्यानंतर तातडीने त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य वैद्यकीय उपचार सुरू आहेत. स्पीडबोटमध्ये ब्रिटन आणि रशियाच्या दोन महिला आणि भारतातील पाच पुरुष असे एकूण सात जण होते. पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, एका रशियन महिलेसह चार भारतीय पुरुष आणि पाच जण समुद्रात बुडाले आहेत.

गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबई-पुणे हायवेवर अपघाताचा थरार; IIT मुंबईच्या ३ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

रुग्णालयात दाखल केलेल्या गौतम सिंघानिया यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर अनेकांनी त्यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांसाठी सिंघानिया यांच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत. तसेच या अपघातात प्रभावित झालेल्या इतर व्यक्तींच्या प्रकृतीसाठीही प्रार्थना करण्यात आलीये.

कोण आहेत गौतम सिंघानिया?

उद्योगपती गौतम सिंघानिया हे रेमंड ग्रुपचे चेअरमेन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांचे इतर क्षेत्रातही उद्योग आहेत. ते दक्षिण मुंबईत 'जे के हाऊस'मध्ये वास्तव्यास आहेत.

गौतम सिंघानिया कोण आहेत?

गौतम सिंघानिया हे रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आहेत. तसेच ते प्रसिद्ध उद्योगपती आहेत.

सिंघानिया यांचा अपघात कुठे झाला?

सिंघानिया यांचा अपघात मालदिवमध्ये झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.