Iran War Update : अखेर इराण अमेरिका-इस्रायलसमोर झुकला, राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांचं सर्वात मोठं वक्तव्य
GH News March 21, 2026 01:10 PM

इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. एकप्रकारे ही इराणची हारच म्हणावी लागेल किंवा इराण इस्रायल-अमेरिकेच्या भयानक ताकदीसमोर झुकला असाच याचा अर्थ काढता येईल. मध्य पूर्वेत इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायलने सुरु केलेल्या युद्धाला आज तीन आठवडे पूर्ण होतील. या युद्धाचा अजून निकाल लागलेला नाही. हे युद्ध सुरु करताना अमेरिका-इस्रायलची जी उद्दिष्टय होती, ती देखील इतक्या लवकर पूर्ण होण्याच्या टप्प्यात नाहीत. हे युद्ध अजून किती काळ लांबेल हे सांगता येत नाही. इराणने त्यांच्या युद्ध नितीचा भाग म्हणून स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद केलं, आखाती देशांमधील तेल-गॅस प्रकल्पांवर हल्ले केले, जेणेकरुन अमेरिका-इस्रायलसह जगावर दबाव येईल. त्यांची ही रणनिती सफलही झाली. पण आता इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांनी केलेलं एक वक्तव्य महत्वाचं आहे.

मसूद पेजेश्कियान यांनी इराणी जनतेला नवरोजच्या शुभेच्छा दिल्या. आम्हाला शेजारी देशांसोबत युद्ध नकोय यावरही त्यांनी भर दिला. त्यांच्या संदेशात त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचं महत्व आणि प्रदेशातील अन्य देशांसोबत भक्कम संबंधांचं महत्व अधोरेखित केलं. यावेळी ते असही म्हणाले की, ‘अणवस्त्र प्राप्त करण्याची आमची इच्छा नाही’. पेजेश्कियान यांचं हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. कारण इराणच्या अणवस्त्र प्राप्त करण्याच्या महत्वकांक्षेमुळेच या युद्धाची सुरुवात झाली. इराण मागच्या अनेक वर्षांपासून अणूबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करत आहे. इस्रायल-अमेरिका त्यांना असं करण्यापासून रोखत आहे. या अणू बॉम्बच्या नादात इराण विरुद्ध इस्रायल हे दुसरं युद्ध आहे.

हेच कारण युद्धाच्या मूळाशी

जून महिन्यात इराण विरुद्ध इस्रायल 12 दिवस युद्ध चाललं. या संघर्षात आतापर्यंत इराणचे अनेक अणू वैज्ञानिक मारले गेले. 28 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या युद्धातही इराणच दररोज मोठं नुकसान होत आहे. त्यांचे अणू प्रकल्प, मिसाइल बनवणारे कारखाने अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात उद्धवस्त झाले आहेत. आता जर इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान आम्हाला अणू बॉम्ब मिळवायचा नाही असं म्हणत असतील तर जगासाठी ती चांगली गोष्ट आहे. यामुळे युद्ध लवकर थांबू शकतं. एकप्रकारे इराण अमेरिका-इस्रायलसमोर झुकला असाच त्याचा अर्थ निघतो. कारण इराणची अणूबॉम्ब प्राप्त करण्याची महत्वकांक्षा हीच या युद्धाच्या मूळाशी आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.