बाजारात 10 रुपयांना मिळणारी ही एक वस्तू फक्त खिशात ठेवा, आयुष्यात साप कधी जवळ येणार नाही, घरापासूनही राहील दूर
Tv9 Marathi March 22, 2026 12:45 AM

अनेकांना सापाची भीती वाटते, साप पहाताच अंगावर काटा येतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आजही सापांबद्दल आपल्या मनात अनेक गैरसमजुती आहेत. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की साप कधीच स्वत:हून एखाद्या व्यक्तीवर हल्ला करत नाही.  साप फक्त दोनच परिस्थितीमध्ये तुम्हाला दंश करू शकतात. एक म्हणजे जर सापाला वाटलं की तुम्ही त्याची शिकार आहात तर आणि दुसरं म्हणजे सापाला तुमच्यापासून काही धोका जाणवला तर आणि तरच तुम्हाला सर्पदंश होण्याची शक्यता असते.  त्यामुळे जर तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला मारू नका. किंवा त्याला पकडण्याचा देखील प्रयत्न करू नका. कारण तुम्हाला सापांबद्दल फारशी माहिती नसते, तुम्ही जो साप पकडणार आहात तो विषारी की बिनविषारी हे देखील तुम्हाला माहिती नसतं, त्यामुळे सापांना पकडण्याचा प्रयत्न करू नका, त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते सापांना पकडून सुरक्षित अधिवासात सोडतील.

दरम्यान असे देखील काही साप असतात जे थंडीच्या दिवसांमध्ये उबेसाठी तुमच्या पांघरुणात प्रवेश करतात आणि तुमची थोडी जरी हालचाल झाली की ते तुम्हाला दंश करतात. जर उदाहारण द्यायचं झालं तर मण्यार जातीच्या सापाचं देता येईल. मण्यार साप हा अत्यंत विषारी प्रजातीचा साप आहे. या सापाचा वावर भारतामधील जवळपास सर्वच राज्यांमध्ये आढळतो. या सापाचं वैशिष्ट म्हणजे हा साप निशाचर आहे, तो रात्रीच्यावेळीच शिकारीसाठी बाहेर पडतो. त्यामुळे माणूस झोपेत असताना या सापाने दंश करण्याचं प्रमाण हे इतर सापांपेक्षा खूप जास्त आहे. बर हा साप चावला तर लवकर कळत देखील नाही, मात्र त्यानंतर अचानक विषाचा प्रभाव जाणवायला लागतो. वेळेत उपचार न मिळाल्यानं रुग्ण दगावू देखील शकतो. इतर सापांपेक्षा या सापामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण हे अधिक आहे.

दरम्यान त्यामुळे सापांपासून नेहमी सतर्क असलं पाहिजे. अशी काही वस्तू, झाडं असतात. ज्यामुळे साप तुमच्या घरात प्रवेश करत नाहीत. या झाडांचे गुणधर्म असे असतात ज्यामुळे सापांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे अशा ठिकाणी साप येत नाहीत. अशीच एक वनस्पती आहे ती म्हणजे सर्पगंधा ही वनस्पती जर तुमच्या घरात असेल तर साप घरात प्रवेश करत नाही. तसेच या झाडाच्या काही वाळलेल्या काड्या जरी तुमच्या खिशात असतील तरी देखील तुम्ही सापांपासून सुरक्षित राहू शकतात, असं म्हटलं जातं.  दरम्यान जर सर्पदंश झालाच तर कुठेही वेळ वाया न घालवता थेट वैद्यकीय उपचार घ्यावेत, ज्यामुळे तुम्ही सुरक्षित राहू शकतात.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.