Dharavi Crime: धक्कादायक! क्षुल्लक वाद टोकाला गेला अन् धारावीत रक्ताचा सडा पडला; मित्रानेच तरूणाला निघृणपणे संपवलं, काय घडलं?
esakal March 22, 2026 02:45 AM

मुंबईतील धारावीमध्ये एक धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आली आहे. धारावी परिसरात मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे. वादानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. यानंतर एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दोघांनाही नशेचे व्यसन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. तर याचे धक्कादायक कारण समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पार्किंगच्या किरकोळ वादातून आशिक खान नावाच्या व्यक्तीने २२ वर्षीय तरुण अश्विन नाडर याला निर्घृणपणे मारहाण केली. या दुःखद घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस तपास करत आहेत. ही घटना दुचाकी पार्किंग लॉटजवळ घडली. जिथे अश्विन नाडरचा आशिक खान नावाच्या एका तरुणासोबत वाद झाला. या वादाचे रूपांतर लवकरच हिंसक हाणामारीत झाले.

'साहेब! लग्नाला ६० वर्ष झालीत, तरीही माझे हे...'; ८८ वर्षीय पतीविरोधात ८५ वर्षीय महिलेची भलतीच तक्रार, काय घडलं?

उपस्थित लोकांनी त्या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थिती निवळली नाही. आशिक खानने कथितरित्या आपला हल्ला सुरूच ठेवला आणि अश्विनला गंभीर जखमी केले. त्याला तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे उपचारादरम्यानत्याचा मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेनंतर धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आशिक खान २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. पोलीस घटनास्थळावरील पुराव्यांची तपासणी करत असून, साक्षीदारांचे जबाब नोंदवत आहेत.

महाराष्ट्राचे पोलिस आरोपीला पकडायला यूपीमध्ये पोहोचले, लोकांनी त्यांनाच चोर समजून चोपले; एका गोष्टीमुळे झाली गडबड

साक्षीदारांनी असेही सांगितले की, बघ्यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या असून, बहुतेक वापरकर्त्यांनी त्वरित न्यायाची आणि या प्रकरणावर अधिक तपासाची मागणी केली आहे. कथित गुन्हेगाराचा शोध सुरू असल्यामुळे हे प्रकरण आता चर्चेत आले आहे. कारण त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या मुद्द्यांकडे आणि हिंसक मतभेद त्वरित सोडवण्यासाठी कारवाई करण्याच्या गरजेकडे लक्ष वेधले गेले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.