Ashok Kharat: अशोक खरातची 6 तासांपासून SIT कडून कसून चौकशी सुरु! आणखी तीन महिला तक्रारीसाठी आल्या पुढे अन्...; चौकशीचा तपशील आला समोर
Sarkarnama March 22, 2026 02:45 AM

Ashok Kharat SIT Interrogation : स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरात यानं शेकडो महिलांचा लैंगिक छळ आणि अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असून विशेष तपास पथकाद्वारे त्याची चौकशी केली जात आहे.

Nashik Water Issue : आमचं पाणी चोरलं जातय, डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन भाजप नगरसेविका थेट सभागृहात पोहोचल्या

याप्रकरणाच्या चौकशीसाठी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक नेमण्यात आलं आहे. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकणाचा तपास हा विशेष तपास पथकाकडून केला जाईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार, नाशिकच्या पोलीस क्लबमध्ये गेल्या ५ तासांपासून SITच्या टीमकडून अशोक खरातची प्रत्यक्ष चौकशी सुरु आहे. खरातचा ऑफिसबॉय नीरज जाधव आणि खरातची समोरासमोर चौकशी केली जात आहे. या चौकशीतला धक्कादायक तपशील आता समोर आला आहे.

Top 10 News: राष्ट्रवादीत मोठ्या उलथापालथीचे संकेत,भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर,मनोज जरांगेंचा तडकाफडकी मोठा निर्णय, थोपटेंच्या घरात मोठं पद? कोणत्या मुद्द्यांवर चौकशी सुरु?
  • आरोपी कॅप्टन खरातने शेकडो महिलांचे शोषण केल्याची माहिती समोर आली असून त्याबाबत डिटेल माहिती गोळा करण्याचं काम सुरु

  • सध्या तीन महिला तक्रार देण्यासाठी पुढे आल्या असल्याची माहिती मिळाली आहे, आणखी काही महिला पुढे येण्याच्या शक्यता आहे.

  • नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये कॅप्टन खरातसह त्याच्या संपर्कातील अन्य लोकांच्या विरोधातील लैंगिक अत्याचार, खंडणी आणि ब्लॅकमेलिंगच्या तक्रारींची माहिती घेण्याचं काम सुरू आहे.

  • कॅप्टन खरातचे कार्यालय, निवासस्थानावरील लॅपटॉप, कम्प्युटर, हार्ड डिस्क आणि सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरू

  • कॅप्टन अशोक खरात यांच्या मोबाईलमधील सर्व संभाषणाचे सीडीआर काढण्याचे काम देखील सुरू आहे.

  • © Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.