गारगोटी : आदमापूर (ता. भुदरगड) येथील लाखो भाविकांचे श्रद्धस्थान असलेल्या संत बाळूमामा यांच्या भंडारा उत्सव व अमावस्येनिमित्त आदमापूर येथे दाखल झालेल्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी ‘लालपरी’ अक्षरशः धावली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या गारगोटी आगाराने उत्कृष्ट नियोजन आणि तत्पर सेवेच्या जोरावर १८ लाख ८२ हजार ५८६ रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळविले. कोल्हापूर विभागीय नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली १४ मार्च ते १९ मार्च या सहा दिवसांत राबवण्यात आलेल्या विशेष वाहतूक मोहिमेत भाविकांना सुरक्षित, जलद आणि सुलभ सेवा देण्यात आली.
Vaibhavwadi Kolhapur Railway : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग आचारसंहितेनंतर भूसंपादन, बजेटमध्ये सव्वातीन हजार कोटींची तरतूद; असा आहे मार्गया काळात ३० हजार ५२४ प्रवाशांनी एसटीचा प्रवास केला असून, गारगोटी आगाराच्या बसेसनी २४ हजार ४०३ किलोमीटरचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला. भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन आगाराने नियोजनबद्ध पद्धतीने ५४० जादा फेऱ्या चालवल्या. त्यामुळे प्रवाशांची कोणतीही गैरसोय न होता सर्वांना वेळेवर दर्शनासाठी पोहोचणे शक्य झाले.
भंडारा उत्सवाचा मुख्य दिवस १५ मार्च आणि त्यानंतरच्या अमावस्येच्या पार्श्वभूमीवर विशेष नियंत्रण कक्ष उभारला होता. चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांची अतिरिक्त फौज तैनात करण्यात आली होती. सुयोग्य व्यवस्थापनामुळे प्रतिकिलोमीटर ७७.१४ रुपये
उत्पन्न मिळाले.
थेट तिकीट विक्री : १०,१९, ९१० रु.
शासकीय प्रतिपूर्ती : ८, ६२,६७६ रु.
एकूण उत्पन्न : १८, ८२, ५८६ रु.
विभागीय नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्मचारीवृंदाच्या अथक परिश्रमामुळे कामगिरी शक्य झाली. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ ब्रीदवाक्य समोर ठेवून चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली. त्यामुळे ३० हजारांहून अधिक भाविकांना सुखरूप दर्शन घडवता आले. ही कामगिरी आगारासाठी अभिमानास्पद आहे.
- अनिकेत चौगुले, आगार व्यवस्थापक, गारगोटी आगार