शिवांजली शाळेला ई-लर्निंग प्रोजेक्टर
esakal March 22, 2026 05:45 PM

पिंपळवंडी, ता. २२ : येथील शिवांजली विद्यानिकेतन शाळेत शुक्रवारी (ता. २२) ई-लर्निंग प्रोजेक्टरचे उद्घाटन करण्यात आले.
ट्रेसिबल गिव्हिंग या कंपनीच्या वतीने इयत्ता दहावीच्या वर्गात हा ई-लर्निंग प्रोजेक्टर बसवण्यात आला. शिवांजली ग्रामविकास प्रतिष्ठान चाळकवाडीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी चाळक यांनी ई-लर्निंग प्रोजेक्टरचा वापर दररोज करावा, विद्यार्थ्यांनाही हाताळण्यास द्यावा याबद्दल सूचना दिल्या. ट्रेसिबल गिव्हिंगचे समन्वयक करुणेश कुमार यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना ई-लर्निंग प्रोजेक्टर संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी बाबाजी वायकर, विकास पादिर, शुभम बावस्कर, बाबासाहेब जाधव, संतोष जेडगुले, संतोष चव्हाण, बंडू सदामते, विष्णू बोरसे, कमळ शिरोळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक कुऱ्हाडे यांनी केले. आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक भानुदास चासकर यांनी मानले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.