''चासकमानच्या आवर्तनाचे योग्य नियोजन करा''
esakal March 23, 2026 09:45 PM

तळेगाव ढमढेरे, ता. २३ : शिरूर तालुक्यात चासकमानच्या पाण्याच्या उन्हाळी आवर्तनाचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रशेखर पाचुंदकर यांनी केली आहे. कोंढापुरी (ता.शिरूर) येथील तलावात चासकमानचे पाणी सोडावे या मागणीसाठी शिक्रापूर येथील शाखा अभियंता प्रज्ञा जगताप यांची पाचुंदकर व शेतकऱ्यांनी भेट घेऊन पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी केली. "वरिष्ठांशी चर्चा करून चासकमानच्या पाण्याचे योग्य नियोजन केले जाईल,'''' असे आश्वासन शाखा अभियंता प्रज्ञा जगताप यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.