जेव्हा विमानात प्रवाशाने केली ही मागणी, एअर होस्टेसने देखील मान्य केली, व्हिडीओ व्हायरल !
Tv9 Marathi March 23, 2026 09:45 PM

विमानात अनेकदा प्रवाशांच्या चित्रविचित्र मागण्यांनी एअर होस्टेसचे डोके भुणभुणत असते. काही वेळा प्रवाशी एकमेकांशी भांडत असतात, त्यावेळी विमानातील स्टाफची अक्षरश: कसोटी लागत असते. अनेकदा प्रवासी हवाई सुंदरीकडे केलेल्या मागणीने एअर होस्टेस पेचात पडतात. आता एका विमान प्रवाशाने एअर होस्टेसकडे एक वेगळीच मागणी केली. त्यामुळे विमानातील हवाई सुंदरीला ती मागणी पूर्ण करावी लागली.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर @vanshmotwani23 नावाच्या हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीलेय की, मी या चांगल्या अनुभवासाठी एतिहाद एअरवेजचे कायम ऋृणी राहिल. या फ्लाईटचा संपूर्ण स्टाफ खूपच स्वीट आणि हेल्पफुल आहे. व्हिडीओत दाखवले गेले आहेकी लँडींगनंतर एतिहादच्या एका एअर होस्टेसकडे एका भारतीय प्रवाशाने कॉकपिट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी या एअर होस्टेसने त्या प्रवाशांचा हिरमोड न करता त्याची इच्छा कशी पूर्ण करते हे या व्हिडीओत दाखवण्यात आले आहे. या व्हिडीओने युजर्सचे हृदय जिंकले आहे.

एक प्रवासी फ्लाईटमध्ये एअर होस्टेसला कॉकपिट पाहण्याची इच्छा व्यक्त करतो. लँडींग नंतर त्याला परवानगी दिली जाते. त्यानंतर हा व्यक्ती कॉकपिटच्या आत जातो आणि तेथील अद्भूत अनुभव आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करतो.

एतिहाद एअरवेजच्या उड्डाणादरम्यान एका साधारण प्रवाशाच्या विनंतीवरुन केबिन क्रुने जराही नकार न देता तत्पतरता दाखवली याचे कौतूक होत आहे. वंश मोटवाणी यांनी इंस्टाग्रामवर या विनाच्या आतील एक व्हिडीओ शेअर केला आङे. ज्यात एका फ्लाईट अटेंडेंटला विचारताना दिसतात की मला तुम्ही कॉकपिट दाखवू शकता?
व्हिडीओ फ्लाईट अटेंडेंट आधी सावधानतापूर्वक उत्तर देते. कारण सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाणादरम्यान अशा प्रकारची विनंती शक्यतो मान्य केली जात नाही. मात्र, ही फ्लाईट अटेंडेंट प्रवाशाला सांगते की विमान लँड झाल्यानंतर तुमची मागणी पूर्ण केली जाईल.

येथे पाहा व्हिडीओ –

View this post on Instagram

A post shared by Vansh Motwani (@vanshmotwani23)

फ्लाईट अटेंडेंटने दिलेल्या आश्वासनानुसार जेव्हा विमान लँड होते तेव्हा या प्रवाशाला या विमानाच्या कॉकपिटमध्ये जाण्यासाठी परवानगी दिली जाते. हा विमान प्रवासी या कॉकपिटमध्ये जातो तेथे तो त्या पायलटशी बोलतो. एअरलाईनच्या स्टाफचे हे सौजन्य पाहून युजरना आश्चर्य वाटते. या प्रवाशाने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर एतिहाद एअरवेजने देखील कमेंट केली आहे. एतिहादने चांगल्या फिडबॅकसाठी या प्रवाशाचे देखील आभार मानले आहेत. आणि यापुढेही एकत्र प्रवास होईल अशी आशा व्यक्त केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.