Narendra Modi In WITT : टीव्ही 9 नेटवर्कने आयोजित केलेल्याव्हाट इंडिया थिंक्स टुडे (WITT) समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची भूमिका मांडली. सध्याच्या जागतिक पातळीवरील घडामोडीत भारताची भूमिका काय आहे? जागतिक घडामोडीमध्ये भारत नेमका कुठे आहे? भारतात नेमका काय विकास झाला? यावर मोदी यांनी सविस्तर भाष्य केले. आपल्या भाषणात मोदी यांनी पश्चिम बंगाल या राज्याच्या विकासावरही भाष्य केले. त्यांनी बंगालमधील विद्यमान तृणमूल काँग्रेसच्या सरकारवरही टीका केली. तृणमूलच्या सरकारने पश्चिम बंगालमध्ये केंद्राच्या अनेक योजना चालू दिलेल्या नाहीत. त्यामुळे या राज्याचा विकास रखडलेला आहे, असा गंभीर आरोप मोदी यांनी केला.
जगालाही हा नवा भारत दिसतोयपूर्वीही योजना व्हायच्या. पण आज परिणाम दिसत आहे. पूर्वी गती धीम होती. पण आज भारत फास्ट ट्रॅकवर आहे. आज संकल्प सिद्धीला जात आहे. त्यामुळे जगालाही हा नवा भारत दिसत आहे. आपल्या विकासासाठी भारत काहीच कसूर सोडत नसल्याचं दिसत आहे. भूतकाळात विकासाचं असंतुलन झालं होतं, आज त्याचं संधीत रुपांतर करायचं आहे, असे मत मोदी यांनी व्यक्त केले.
बिहारमध्ये सहा सात दशकात…पूर्व भारत संसाधनाने भरपूर भरलेला आहे. अनेक दशकांपासून पूर्व भारतात राज्य केलं. त्यांनी काहीच केलं नाही. आज या पूर्व भारतात विकास होत आहे. ओडिसात सेमी कंडक्टरपासून अनेक नव्या सेक्टरचा विकास होत आहे. बिहारमध्ये सहा सात दशकात गंगा नदीवर एकच पूल बनला होता. या बिहारमध्ये गेल्या दशकात पाच ते सहा पूल बनले आहे. उत्तर प्रदेशात कट्टा मॅन्यूफॅक्चरिंगची फॅक्ट्री होता. आता तिथे मोबाईल बनत आहे, असेही मोदी देशातील विकासावर बोलताना म्हणाले.
पश्चि बंगालवर बोलताना मोदी काय म्हणाले?पश्चिम बंगाल हा भारताचा कल्चर, उद्योगाचं हब होतं. केंद्र सरकारने पश्चिम बंगालमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. पण तिथल्या निर्मम सरकारने विकासाला ब्रेक लावला आहे. आयुष्यमान योजना, पीएम आवाज योजना, चाय बागान श्रमिकांसाठीच्या योजनेला ब्रेक लावला आहे. विकास आणि जनकल्याणापेक्षा राजकीय स्वार्थाला निर्मम सरकार प्राधान्य दिलं आहे. काँग्रेसने या प्रकारच्या राजकारणाला सुरुवात केली, अशी टीका मोदी यांनी केली.
मोदींची काँग्रेसवर सडकून टीकातसेच, कोणत्याही प्रकारच्या विकासाला काँग्रेसचा विरोध राहिला आहे. मी गुजरातचा मुख्यमंत्री असतानाही त्यांनी हेच केलं. त्यांनी गुजरातच्या इमेजवर सवाल केला, गुजरातच्या प्रगतीवर टीका केला. हे करत असताना काँग्रेसचा विरोध रिजनल झाला. टीका जेव्हा देशाच्या विकासावर सवाल करत असेल तर हा केवळ सरकारचा विरोध राहत नाही. तर देशाच्या प्रगतीचा विरोध होतो. काँग्रेस आज याच मानसिकतेची गुलाम झाला आहे. प्रत्येक चांगल्या कामात कसूर शोधली जात आहे. कोरोनाच्या लसपासून मेक इन इंडियापर्यंत काँग्रेस टीका करत आली, असाही हल्लाबोल मोदी यांनी केला.