'वीण दोघातली तुटेना' मालिकेत गायक महेश काळेंची सुरेल एंट्री, प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या, Promo पाहून चाहते म्हणाले ..
abp majha web team March 24, 2026 09:44 PM

Veen Doghatali Hee Tutena: झी मराठीवरील वीण दोघातली तुटेना या मालिकेला सध्या प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे या दोघांच्या प्रमुख भूमिका असणारी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.  या मालिकेत सध्या समर आणि स्वानंदी या दोघांमध्ये ऋणानुबंध तयार झाल्याचं दाखवण्यात आलं आहे.तेजश्री आणि सुबोध या दोघांच्याही भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. सध्या या मालिकेची चर्चा आहे ती एका वेगळ्याच कारणाने. झी मराठीने शेअर केलेल्या एका प्रोमोमध्ये या मालिकेत चक्क शास्त्रीय गायक महेश काळेंची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्याही भुवया उंचावल्या आहेत. 

महेश काळेंची सुरेल एन्ट्री 

झी मराठीच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोमध्ये समर स्वानंदी ला फोन करून सांगतो ' खूप मोठा प्रॉब्लेम झालाय तुम्ही बाबांना घ्या आणि मी पत्ता पाठवतो तिथे या ' यावर स्वानंदीच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतं. ती तातडीने दिलेल्या पत्त्यावर पोहोचते. तिथे पोहोचल्यावर आत डोकावून बघते तेव्हा तिला तिथे गायक महेश काळे यांची संगीत मैफिल असल्याचं कळतं.  नंतर स्वानंदीचे बाबा तिला म्हणताना दिसतात की मला महेश काळे यांची गाणी खूप आवडतात. माझी इच्छा होती की त्यांची एकदा तरी भेट व्हायला हवी.. तेवढ्यात मागून महेश काळे चालत येतात. आणि स्वानंदीचे बाबा आश्चर्यचकित होतात. या प्रोमोमध्ये चाहत्यांना महेश काळे यांच्या आवाजात सुरेल गाणं ऐकू येतं. महेश काळे स्वानंदीला म्हणताना दिसतात ' वहिनी तुम्ही खूप लकी आहात.समर सारखा नवरा तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. समोरचा हा सुरेल नजराणा स्वानंदीच मन जिंकणार का ? असं कॅप्शन लिहीत झी मराठीने हा प्रोमो शेअर केला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

मालिकेचा प्रोमो पाहून चाहत्यांना सरप्राईज मिळाला आहे. अनेकांनी प्रोमो च्या खाली कमेंट करत 'काहीतरी नवीन बघायला मिळणार ' राजवाडे की पोहोच बहुत लंबी है ! चक्क महेश काळे ..मस्त सरप्राईज दिले ' अशा कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तर प्रोमोच्या खाली चक्क फर्माईश केलीये. एका युजरने म्हटलं , " सुरेख आणि सुरेल अशी ही कल्पना.महेशजींचा कार्यक्रम सिरीयल मधला वाढदिवसाला एक वेगळीच रंगत आणणार ! ह्यात एक कट्यार मधील गाणं नक्की होऊ द्या ' महेश काळेंना सिरीयल मध्ये आणणं ही नक्कीच सुबोध सरांची कल्पना ' असंही एका युजरने म्हटलं. दोघांच्याही मैत्रीविषयी अनेकदा चर्चा रंगते . आता थेट सुबोध भावे यांनी मालिकेतच महेश काळे यांना आमंत्रित केल्याने चहात्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.