Satta Sammelan 2026: धर्म काय आहे, जोडतो की तोडतो ? कुमार विश्वास म्हणाले की….
Tv9 Marathi March 24, 2026 11:45 PM

TV9 भारतवर्ष यांचा ‘सत्ता संमेलन’मंगळवारी 24 मार्च रोजी आयोजित केला होता. या कार्यक्रमात कवी कुमार विश्वास यांनी सहभाग घेतला. त्यांना प्रश्न केला गेला की धर्म जोडतो की तोडतो. या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले की अनेक शब्द समाजात प्रचलित केले जातात. आज छोट्या खेड्यातील महिला चर्चा करतात की हा सर्फ खूपच चांगला आहे.तसेच वनस्पती संदर्भात म्हटले जात होते की हा वाला डालडा चांगला आला आहे. डालडा एक प्रोडक्ट होते. शब्द हळूहळू प्रचलित होतात. आणि धर्म शब्द रुढ झाला आहे.

ते म्हणाले की आम्ही धर्माभासाला धर्म समजू लागलो. जर कोणी व्रत करतो, मंदिर जातो, हार घालतो तर आपण म्हणतो खूप धार्मिक माणूस आहे. परंतू तो धर्माची क्रिया करत असतो. तो धार्मिक असेलच असे नाही. जर असे झाले असते तर धर्माचे पालन करणारे इतका उपद्रव कसे करु शकले असते. जगात जेवढा रक्तपात धर्माच्या नावाने झाला आहे तेवढा कशानेच झालेला नाही. कारण लोक धर्माभासात जगत आहेत.

ते म्हणाले की धर्म काय आहे ? मला जे समजते त्यानुसार डोळ्यांचे उदाहरण घ्या. डोळे जुळले जातात. डोळे वटारले जातात. डोळे फूसही लावतात. डोळ्यांचे पंच्याहत्तर उपयोग आहेत. जर डोळ्याने दिसले नसते तर त्याला काय महत्व असते. मनुष्य आधी पशु होता. आणि जेव्हा समाजाची निर्मिती झाली तेव्हा त्याची आध्यात्मिक चेतनेची नियमावली झाली. त्या नियमावलीचे नाव धर्म आहे. तो मनुष्याला मनुष्य बनवते आणि पशूतेपासून मुक्त ठेवते.आणि बाकी जे आहे ते चार बाजूचे आयोजन आहे.

धर्माच्या मुद्यावर राजकारण होते ?

राजकीय पक्षांकडून दाखवलेला धर्म धर्मवितंड असतो का ? या प्रश्नाला उत्तर देताना कुमार यांनी सांगितले की राजनिती जेव्हा जेव्हा अशक्त होते. वा फायदा घेऊ इच्छीते तेव्हा तेव्हा ती धर्माच्या मुद्यांवर चारीबाजूला ताणाबाणा विणते. अनेकदा ती धर्माच्या गोष्टींना विरोध करते. तर अनेकदा समर्थन करते. या सारख्या गोष्टीचा परिणाम खूप वेगाने पडतो.राष्ट्रीयता आणि धर्म मनुष्याच्या आत्म्याच्या असुरक्षाबोधांशी जुडलेले आहेत. येथे प्रहार केला तर खटकन लागते. उर्वरित काहीही बोलले तर फर्क पडत नाही.

ते म्हणाले की भारत आणि जगाची धर्माची परिभाषा खूप वेगळी आहे. कारण देशाचा जो मुळ धर्म आहे तो एकदम वेगळा आहे. आणि जगातील धर्म येथे आले तेव्हा ते भारताच्या धर्मानुसार वळले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.