नॅच्युरल रेशमी आणि चमकदार केस हवेत? तर केसांना लावा हे घरगूती नैसर्गिक हेअर जेल
admin March 25, 2026 11:32 AM
[ad_1]
नॅच्युरल रेशमी आणि चमकदार केस हवेत? तर केसांना लावा हे घरगूती नैसर्गिक हेअर जेल

केसांच्या निगा राखण्यासाठी आजकाल बाजारांमध्ये महागडे प्रोडक्टपासून ते हजारो रुपये खर्च करणाऱ्या ट्रीटमेंटपर्यंत विविध प्रकार उपलब्ध आहेत. ज्यांचा उपयोग अनेकजण केस मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी अवलंब करतात. मात्र कालांतराने त्याचे दूष्परिणाम दिसू लागतात. अशातच नैसर्गिक घटक वापरणे अधिक चांगले आहे. नैसर्गिक घटक फायदेशीर तर असतातच, पण त्यांच्यामुळे केसांचे नुकसान होत नाही. केस मऊ आणि नैसर्गिकरित्या चमकदार बनवण्यासाठी काही नैसर्गिक घटक आहेत ज्यापासून तुम्ही घरी सहज सोप्या पद्धतीने हेअर जेल बनवू शकता जे केसांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

जेव्हा तुम्ही कॉस्मेटिक ट्रीटमेंटने तुमचे केस चमकदार करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा त्यात वापरल्या जाणाऱ्या केमिकलमुळे केसांचे नुकसान होते. यामुळे तुमचे केस काही दिवसांसाठी सुंदर दिसत असले तरी, कालांतराने नुकसान होऊ शकते. याकरिता आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की आपल्या स्वंयपाकघरात असे काही नैसर्गिक घटक आहेत ज्यापासून तुम्ही तुमचे केस मऊ आणि चमकदार बनवू शकतात.

भेंडीपासून हेअर जेल तयार करणे

भेंडीपासून तयार केलेला हेअर जेल केस मऊ करण्यासाठी प्रभावी आहे. हे जेल तुमच्या केसांना पोषणही देतो. यासाठी भेंडी चिरून पाण्यात टाका आणि 10 मिनिटे उकळवा. आता हे पाणी थंड होऊ द्या आणि कॉटनच्या कापडातून हे पाणी गाळून घ्या. आता हे पाणी जेल स्वरूपात तयार झालेलं असेल तर हेच जेल तुमच्या केसांचे व्यवस्थित भाग करून संपूर्ण केसांना लावा. किमान 30 मिनिटे तसाच राहू द्या. त्यानंतर केस धुवा.

अळशीपासून तयार हेअर जेल

अळशी बियांपासून तयार हेअर जेल तुमच्या केसांवरही आश्चर्यकारक परिणाम होतात. अळशीच्या बिया भाजून खाल्ल्याने केसांना आतून पोषण मिळते, तर त्यापासून तयार जेलमुळे केस चमकदार आणि मऊ होतात. यासाठी अळशी पाण्यात उकळा. हे पाणी हळूहळू जेलमध्ये रूपांतरित होईल. थंड झाल्यावर ते गाळून घ्या आणि केसांना लावा. तुम्ही हे एकदा बनवून काही दिवसांसाठी फ्रिजमध्ये ठेवू शकता. हे जेल त्वचेलाही लावता येते.

मेथीच्या दाण्यांपासून तयार करा हेअर जेल

मेथी केसांसाठी एक वरदान आहे. यासाठी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. नंतर, मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून ते बारीक वाटून घ्या. हे मिश्रण कॉटनच्या कापडात घेऊन गाळून घ्या. यामुळे एक बारीक जेल तयार होईल. ते तुमच्या केसांना लावा आणि 20 ते 25 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर, साध्या पाण्याने केस धुवून टाका.

कोरफड जेल लावा

कोरफडीचा गर केसांसाठी किती फायदेशीर आहे हे बहुतेक लोकांना माहीत आहे. काही दिवस नियमितपणे लावल्याने तुमचे केस खूप मऊ होऊ शकतात. शॅम्पू केल्यानंतर कंडिशनरऐवजी ताजा कोरफडीचा गर लावून 10 मिनिटांनी धुवून टाकल्यास प्रभावी परिणाम मिळतात. तुम्ही कोरफडीच्या जेलमध्ये अंडे किंवा दही देखील मिक्स करून केसांना लावू शकता, ज्यामुळे केस आणखीन मऊ, चमकदार आणि निरोगी होतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.