सुनेत्रा पवार यांच्या लेटरबॉम्बने खळबळ, निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी; पक्षाचा…मोठी माहिती समोर!
Tv9 Marathi March 25, 2026 08:45 PM

Sunetra Pawar : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे राजकारण बदलून गेले आहे. खासदार असलेल्यासुनेत्रा पावर आता राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. तर अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याकडे राज्यसभेची खासदारकी आली आहे. सोबतच सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी पक्षाचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. असे असतानाच आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना धक्का देणारी माहिती समोर आल आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात राष्ट्रवादी पक्षासंदर्भात एक मोठी मागणी करण्यात आली आहे. या मागणीमुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला असे का सांगितले असावे? असा प्रश्नही राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

सुनेत्रा पवार यांच्या पत्रात नेमके काय आहे?

सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्राचे वेगवेगवळे अर्थ लावले जात आहेत. त्यांनी लिहिलेल्या या पत्रात निवडणूक आयोगाला एक महत्त्वाची माहिती दिली आहे. 28 जानेवारी 2026 रोजीनंतर पक्षाने केलेला कुठलाही पत्रव्यवहार वैध मानू नये, अशी विनंती सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजीच विमान अपघात झाला होता. म्हणजेच अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाने आतापर्यंत केलेला कोणताही पत्रव्यवहार अवैध मानावा, अशी विनंतीच सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना धक्का?

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होईल, अशी चर्चा रंगली होती. परंतु ही चर्चा हवेतच विरली. त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घ्यायचा होता, असा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर आता सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेले हे पत्र समोर आले आहे. त्यामुळेच हे पत्र म्हणजे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना धक्का तर नाही ना? असा सवाल उपस्थित केला जातोय.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.