…तर आकाश पाताळ एक करू; अजितदादांच्या अपघातावर सभागृहात फडणवीस काय म्हणाले?
Tv9 Marathi March 25, 2026 10:45 PM

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघातावर आमदार रोहित पवार यांच्याकडून सातत्यानं शंका उपस्थित करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणात कर्नाटकमध्ये एफआयर दाखल झाला यावर सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे,  ‘मी तुम्हाला अश्वासीत करतो, तुमच्या मनात शंका ठेवू नका, आकाश पाताळ एक करू पण या केसमध्ये जर कोणाचा घातपात असेल तर कोणाचा बापही असला तरी त्याला आम्ही सोडणार नाही. मुडदा असेल तर त्यालाही जमिनीतून खोदून काढू,  सहन नाही करणार. कदाचित तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते, पण इतकी बोथट नाहीये. अजितदादांच्या केसमध्ये, कोणी काही कट कारस्थान करेल आणि आम्ही त्याला सोडून देऊ, त्याचा मुडदाही खोदून काढू असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?   

रोहीत पवार राहूल गांधी यांना भेटले,  ⁠त्यांनी कर्नाटकमध्ये एफआयआर  करायला सांगीतला
⁠मात्र तसा झिरो एफआयर करता येत नाही.  तो चुकीचा आहे.  ⁠कर्नाटकने राजकीय दृष्ट्या तपास नीट सुरु नाही, यासाठी हा एफआयर दाखल केला आहे.  ⁠महाराष्ट्राची मानहानी करण्यासाठी हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ⁠ तुमच्या मनात शंका ठेवू नका
⁠जर यात कोणी असेल तर आकाश पाताळ एक करु, मुडदा देखील खोदून काढू.  ⁠तुम्ही तरुण आहात तुमच्या भावना समजू शकतो, मात्र इतरांच्या भावना ही तेवढ्याच आहेत, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सदर प्रकरण सिबीआयकडे पाठपुरावा सुरू आहे, रोहीत पवार यांनी भावनिक मुद्दा मांडला. याची चैकशी होऊन सत्य बाहेर आलं पाहिजे. रोहीत पवार यांना आमचा पाठिंबा आहे, मात्र इतर कोणाला घेणंदेणं नाही असा समज होऊ नये. राष्ट्रवादीचे आमदार तीन वेळा चौकशी संदर्भात मला भेटले, ⁠अमित शहा यांच्याकडे घेऊन जा अशी त्यांनी मागणी केली, अधिवेशन संपल्यानंतर त्यांना घेऊन जाऊ, असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.