Weather News : राज्यावर अवकाळीचे संकट कायम, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; १० जिल्ह्यांना अलर्ट
Saam TV March 26, 2026 12:45 PM
  • राज्यात तापमान चाळिशीपार

  • उष्णतेचा तडाखा वाढला

  • काही भागात वादळी पावसाचा अंदाज

  • येलो अलर्ट जारी

  • हवामानातील बदलामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका वाढला असून पारा चाळिशीपार गेला आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.

काल म्हणजेच बुधवारी महाराष्ट्रातील अमरावती आणि वर्धा येथे देशातील उच्चांकी ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परभणी आणि ‎‎अकोला येथे ३९ अंशापेक्षा अधिक, ‎धुळे, मालेगाव, ‎ब्रह्मपुरी, ‎‎वाशीम, यवतमाळ ३८ अंश सेल्सिअस आणि त्यापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. निफाड येथे १३.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

Shocking : २ बायकांपासून १८ मुलं, तरीही माजी सरपंच तिसरीच्या प्रेमात पडला, गर्लफ्रेंडने भेटायला बोलावून केलं भयंकर कृत्य

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात बुधवारी मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. तसेच कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत उष्ण लाटेचा व दमट हवामानाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.

Shocking : 'खरात'सारखाच आणखी एक इंजेक्शनवाला बाबा! उपचाराच्या नावाखाली महिलेवर बलात्कार

राज्यात इतर ठिकाणी उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरवला आहे. तर दुसरीकडे उकाडा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.