भारताने आपली हवाई सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल उचललं आहे. DRDO ची प्रोजेक्ट कुशाची पहिल्या टप्प्याची चाचणी यशस्वी झाली आहे. प्रोजेक्ट कुशातंर्गत डीआरडीओ स्वदेशी बनावटीची एअर डिफेन्स सिस्टिम विकसित करत आहे. पश्चिम आशियात युद्ध सुरु असताना भारताच्या डीआरडीओला हे यश मिळालं आहे. DRDO म्हणजे संरक्षण संशोधन विकास संस्था. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने आपली हवाई सुरक्षा अधिक अभेद्य करण्यावर भर दिला आहे. प्रोजेक्ट कुशाला अधिकृतरित्या‘एक्सटेंडेड रेंज एयर डिफेंस सिस्टम’(ERADS) म्हटलं जातं. ही भारताची लांब पल्ल्याची एअर डिफेन्स सिस्टिम आहे.
रशियाच्याS-400आणि S-500 च्या धर्तीवर भारत आपली स्वत:ची अशी एअर डिफेन्स सिस्टिम विकसित करत आहे. या प्रोजेक्टवर जवळपास 21,700 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. देशाच्या प्रमुख सैन्य आणि नागरिक ठिकाणांना सुरक्षा प्रदान करणं हा या प्रोजेक्टचा मुख्य उद्देश आहे. ग्राउंड वॅलिडेशन आणि ड्यूल-पल्स रॉकेट मोटर सारख्या महत्वपूर्ण सिस्टिमची चाचणी यशस्वी ठरली. या प्रोजेक्टच्या आता पुढच्या टप्प्यात इंटीग्रेटेड फ्लाइट टेस्ट होईल. याचवर्षी ही चाचणी होण्याची शक्यता आहे.
प्रोजेक्ट कुशाचं वैशिष्ट्य म्हणजे यात तीन स्तरीय इंटरसेप्टर मिसाइल्स आहेत
M1 मिसाइल: 150 किमी पर्यंत रेंज, फायटर जेट्स आणि प्रेसीजन शस्त्र रोखण्यासाठी वापरणार.
M2 मिसाइल: 250 किमी पर्यंत रेंज, AESA टेक्निकसह अत्यंत अचूक.
M3 मिसाइल: 350-400 किमी पर्यंत रेंज, AWACS आणि बॅलेस्टिक मिसाइल सारखे टार्गेट नष्ट करण्यासाठी सक्षम.
या त्रिस्तरीय सिस्टिमुळे एक मजबूत डिफेन्स नेटवर्क बनेल. शत्रुच्या हवाई हल्ल्याविरोधात हे एक भक्कम सुरक्षा कवच असेल. या सिस्टिममध्ये स्टेल्थ फायटर, ड्रोन, क्रूज मिसाइल सर्व हवाई धोके ओळखून नष्ट करण्याची क्षमता आहे.
2026 मध्ये फ्लाइट टेस्ट सुरु होण्याची अपेक्षा.
2028 मध्ये ऑपरेशनल तैनाती
2030 पर्यंत पूर्ण तैनातीचं लक्ष्य
इंडियन एअर फोर्सने आधीच अनेक स्क्वाड्रन्सना मंजुरी दिली आहे. त्यावरुन या प्रोजेक्टवर असलेला विश्वास दिसून येतो.
प्रोजेक्ट कुशा ‘मिशन सुदर्शन चक्र’ चा महत्वपूर्ण हिस्सा आहे. 2035 पर्यंत संपूर्ण देशात मजबूत एअर आणि मिसाइल डिफेन्स नेटवर्क तयार करण्याचा प्लान आहे. कुशा, आकाश-NG आणि अन्य बॅलेस्टिक मिसाइल डिफेन्स सिस्टिम सोबत मिळून काम करतील.