मार्केट यार्ड - अवकाळी पावसाचा मोठा फटका गव्हाला बसला आहे. बाजारात आवक कमी होते आहे. त्यामुळे गव्हाच्या दरात क्विंटलमागे तीनशे ते चारशे रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गव्हाचे दर तेजीत आहेत.
काही दिवसांपूर्वी गहू उत्पादक प्रदेशात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. सध्या गुजरातमधील सौराष्ट्र, खानदेश आणि मध्य प्रदेश येथून गव्हाची आवक सुरू आहे. नव्या हंगामातील गव्हाची नियमित आवकही सुरू आहे. एप्रिलअखेरपासून बाजारात हरियाणा आणि पंजाब येथील गव्हाची आवक सुरू होणार आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
अवकाळी पावसामुळे बाजारात गव्हाची आवक मागणीच्या तुलनेत कमी होत आहे. त्यामुळे गव्हाचे दर तेजीत आहेत. दररोजच्या दैनंदिन जीवनात गव्हाची मोठी मागणी असते. गव्हापासून ब्रेड आणि बेकरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात बनतात. देशात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह आणखी काही राज्यात गव्हाचे जास्त प्रमाणात उत्पन्न घेतले असल्याची माहिती व्यापारी श्याम लढ्ढा यांनी दिली.
घाऊक बाजारातील क्विंटलचे दर (दर्जानुसार)
गव्हाचा प्रकार - एप्रिल २०२५ - एप्रिल २०२६
मध्य प्रदेश लोकवन - ३२०० ते ३८०० - ३७०० ते ४७००
मध्य प्रदेश सिहोर - ४४०० ते ५४०० - ४८०० ते ५८००
खानदेश लोकवन - २९०० ते ३४०० - ३००० ते ३५००
गुजरात लोकवन - ३६०० ते ४००० - ३७०० ते ४२००
येथे होतो निर्यात
बांगलादेश, श्रीलंका, युक्रेन, मलेशिया, चीन, नेपाळ, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, येमेन रिपब्लिक, कतार, ओमन आणि पश्चिम आशियातील काही देशात गहू निर्यात केला जातो.