राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 4 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. असे झाल्यास हा शरद पवार यांना मोठा धक्का असणार आहे. या बातमीने राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
शरद पवार यांचे 4 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कातसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 4 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. हे खासदार मराठवाडा आणि विदर्भातील आहेत, असंही समोर आलं आहे. त्याचबरोबर हे खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या पक्षांने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 8 जागांवर विजय मिळवला होता, यातील 4 खासदार हे आता एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
राज्यात मोठे भूकंपराज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून मोठे भूकंप झालेले आहेत. सुरूवातील एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला होता, ज्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यंमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे, आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आणखी 4 खासदार सामील होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रावादीतही फूटशिवसेनेत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीतही फूट पडली होती. अजित पवार हे अनेक आमदारांना घेऊन सत्तेत सहभागी झाले होते. त्यावेळी शरद पवार यांना मोठा धक्का बसला होता. मात्र शरद पवार यांच्या पक्षांने लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करत 8 जागांवर विजय मिळवला होता. आता यातील 4 खासदार हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत, त्यामुळे पक्षाला पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.