BJP Annamalai: तामिळनाडूत भाजपला जोरदार झटका! अण्णामलाईंनी घेतला मोठा निर्णय; हायकमांडला लिहिलं पत्र
Sarkarnama March 27, 2026 11:45 PM

BJP Annamalai: तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून भाजपनं यावेळी या राज्यात शिरकाव करण्यासाठी कंबर कसली आहे. तामिळनाडूच नव्हे तर केरळमध्येही भाजपला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. दक्षिण भारतात भाजपला जनाधार नाही, त्यामुळं इथं आपलं अस्तित्व तयार करण्यासाठी भाजपची धडपड सुरु असताच तामिळनाडूतील त्यांचा हुकमी एक्का आणि माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळं त्यांनी मोठा निर्णयही घेतला असून यामुळं भाजपला जोरदार झटका बसला आहे. यासंदर्भात त्यांनी थेट हायकमांडला पत्रही लिहिलं आहे.

Farmers Relief : अतिवृष्टी व पूर बाधीत शेतकऱ्यांना पॅकेजची रक्कम कशी मिळणार? निकष काय? शासनानं जाहीर केली नियमावली

अण्णामलाई यांनी भाजप आणि अद्रमुक यांच्या युतीमध्ये जागा वाटपावर नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी दिल्लीतील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पत्रही लिहिलं आहे. भाजपला विजयाच्या दृष्टीनं सोप्या असलेल्या जागा अद्रमुकनं स्वतः जवळ ठेवल्या असून जिंकण्यास अवघड जातील अशा जागा भाजपला दिल्या आहेत, असा अण्णामलाई यांचा दावा आहे. यामध्ये किनाथुकडावूच्या जागेचा समावेश आहे. या जागा वाटपावरुन अण्णामलाई अत्यंत नाराज असून त्यांनी विधानसभा निवडणूकच न लढण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीला लिहिलेल्या पत्रातही त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

Rupali Chakankar: खरात प्रकरणावर बोलताना अंधारेंनी अचानक घेतलं संगीतकार अनू मलिकांचं नाव, चाकणकरांवर केले गंभीर आरोप; म्हणाल्या, सोहम चाकणकर...

अण्णामलाई यांची नाराजी आता भाजपच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी अण्णामलाई यांच्या समर्थनार्थ किनाथुकडावू इथं निषेध आंदोलनही केलं. तसंच जागा वाटपाच्या व्यवस्थेवर रागही व्यक्त केला.

Sambhaji Nagar: अखेर संभाजीनगरच्या नागरिकांना मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेल संदर्भातील 'तो' महत्वाचा निर्णय घेतला मागे

दरम्यान, तामिळनाडूत एनडीएनं विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपाला अंतिम रुप दिलं आहे. यामध्ये २३४ जागांपैकी अद्रमुकला १६९ जागा तर भाजप केवळ २७ जागा लढणार आहे. त्याचबरोबर इतर सहकारी पक्षांनाही जागा सोडण्यात आल्या आहेत. यामध्ये PMK च्या वाट्याला १८ आणि AMMK या पक्षाच्या वाट्याला ११ जागा आल्या आहेत. अद्रमुकचे नेते के. पलानीस्वामी यांनी ही माहिती दिली आहे. तामिळनाडूत २३ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. तर ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. यावेळी तामिळनाडूत प्रमुख लढत ही द्रमुक आघाडी विरुद्ध अद्रमुक, भाजप आणि इतर स्थानिक पक्ष यांच्यामध्ये होणार आहे.

Ashok Kharat News: खरातनं अनेकांना कसं गंडवलं? कशी होती त्याची मोडस ऑपरेंडी? फेस, हॉट, कोल्ड' रीडिंगचा वापर
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.