मृत्यू समोर उभा…पण टीसी देवदूत ठरला; प्रवाशाचा 3 सेकंदात जीव वाचला, रेल्वे स्थानकावर थरारक प्रसंग, पाहा Video
esakal March 27, 2026 11:45 PM

मुंबईतील बोरीवली रेल्वे स्थानकावर मोठा अपघात टळला आहे. प्लॅटफॉर्मवर तैनात असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे एका प्रवाशाचा प्राण वाचला आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रवाशाने धावत्या ‘युवा एक्सप्रेस’मधून बोरीवली स्थानकावर उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोल गेल्याने तो प्लॅटफॉर्म आणि रेल्वे यांच्या मधील फटीत पडला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका रेल्वे कर्मचाऱ्याने तत्काळ धाव घेत त्याला बाहेर ओढले, त्यामुळे त्याचा जीव वाचला.

Mumbai: मुंबईत खळबळ! घरावर ईडीची धाड पडलीये अन्...; प्रेयसीला खोटं सांगितलं, ९२ लाख रुपये उकळले, प्रसिद्ध रिलस्टार अटकेत

रेल्वे कर्मचाऱ्याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. काही सेकंद उशीर झाला असता, तर तो प्रवासी रेल्वेखाली गेला असता, अशी प्रतिक्रिया संबंधित कर्मचाऱ्याने दिली. तसेच प्रवाशांनी अशा प्रकारची जोखीम पत्करू नये, असे आवाहनही त्याने केले आहे. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या कर्मचाऱ्याला सन्मानित करण्याची शिफारस केली असून, प्रवाशांना धावत्या रेल्वेत चढणे किंवा उतरणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ST Employees: एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता! वेतन वाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा होणार, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

बोरीवली तसेच मुंबईतील इतर स्थानकांवर अशा प्रकारच्या धोकादायक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अशा अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ‘युवा एक्सप्रेस’सारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेग फलाटावरही जास्त असतो. वेळ वाचवण्याच्या किंवा स्थानक सुटण्याच्या भीतीने प्रवासी उडी मारतात, जे अनेकदा जीवघेणे ठरते. यासाठी रेल्वे प्रशासनाने सुरक्षा कर्मचाऱ्यांची गस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.