खरातचे पाय खोलात! भोंदूविरोधात 100 पेक्षा अधिक तक्रारी, थेट 70 टक्के महिलाच..
Tv9 Marathi March 28, 2026 11:45 AM

भोंदूबाबा अशोक खरात याचे एका मागून एक मोठे कारनामे उघड होत आहेत. महिला पुढे येऊन तक्रारी देताना दिसत आहेत. भोंदूचे काही धक्कादायक व्हिडीओ पुढे आले, त्याने मोठी खळबळ उडाली. पोलिसांकडून एक नंबर जारी करण्यात आला, त्या माध्यमातून महिला तक्रारी नोंदवू शकतात. या प्रकरणात रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. सुरवातीला रूपाली चाकणकर यांनी आपल्या राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता 10 दिवसांनी रूपाली चाकणकर यांच्याकडून महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यात आला.
खरातला अटक झाल्यावर तब्बल 10 दिवसाने हा राजीनामा देण्यात आला. सतत रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना त्यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पाठवला आहे. यादरम्यान त्यांनी यासंदर्भातील एक पोस्टही शेअर केली. रूपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केली जात आहेत.

खरातचे काळे कारनामे एका मागून एक पुढे येत आहेत. मात्र, लेखी तक्रार महिलांकडून द्यायला तेवढा प्रतिसाद नाहीये. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, फोनद्यावरे भोंदू अशोक खरात याच्या विरोधात 100 पेक्षा अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. पाच दिवसांपूर्वी एसआयटीकडून भोंदू अशोक खरात याच्याविरोधात तक्रारी दाखल करण्याकरिता एक हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला होता.

तक्रारींमध्ये 70 टक्के महिलांचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे. मात्र लेखी तक्रारींसाठी प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर आलीये. एसआयटीचे अधिकारी तक्रारदारास सुरक्षिततेची हमी देत मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, काही महिला पुढे येऊन तक्रार देण्यास धजावत नसल्याचे बघायला मिळत आहे.

अशोक खरात विरोधात शुक्रवारी रात्री उशिरा दोन गुन्हे दाखल झाले. एका महिलेची लैंगिक शोषणाची तर एका इसमाची फसवून केल्या प्रकरणी अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली. राजेंद्र भागवत राहणार नेवासा या व्यावसायिकाला व्यवसायिक बरकतीसाठी वेगवेगळ्या अंगठ्या लाखो रुपयांना विकून फसवणूक केल्या प्रकरणी खरात विरोधात गुन्हा करण्यात आला. तर एक विवाहित महिलेचा तिच्या पतीसोबत वाद होत असल्याने त्यावर सल्ला घेण्यासाठी गेली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.