MS Dhoni ruled out: महेंद्रसिंग धोनी दोन आठवड्यांसाठी IPL 2026 मधून बाहेर; CSK ला पहिल्या सामन्याआधी मोठा धक्का
esakal March 28, 2026 02:45 PM

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेला शनिवारी (२८ मार्च) सुरुवात होत आहे. हा १९ वा हंगाम आहे. मात्र या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच पाचवेळचे विजेते चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) कदाचित सुरुवातीच्या दोन आठवड्यांमध्ये खेळताना दिसणार नाही. याबाबत चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) माहिती दिली आहे.

IPL 2026: जॉस हेडलवूड बंगळुरूत आलाय, पण RCB साठी पहिला सामना का खेळणार नाही? समोर आलं मोठं कारण

धोनीला पोटरीची दुखापत असल्याने तो दोन आठवड्यांसाठी आयपीएल २०२६ स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. चेन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सविरुद्ध पहिला सामना ३० मार्च रोजी खेळायचा आहे. मात्र आता धोनीच्या चाहत्यांना त्याला मैदानात पाहण्यासाठी किमान दोन आठवड्यांची वाट पाहावी लागणार आहे.

४४ वर्षीय धोनी खरंतर गेल्या तीन हंगामांपासून गुडघा आणि पोटरीच्या दुखापतीने त्रस्त आहे. २०२३ आयपीएलनंतर त्याने गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करून घेतली होती. आता त्याच्या पोटरीच्या दुखापतीने डोके वर काढले आहे.

चेन्नई सुपर किंग्सने माहिती देताना सांगितले की 'पोटरीच्या दुखापतीवर धोनी सध्या उपचार घेत आहे. परिणामी तो कदाचित आयपीएल २०२६ स्पर्धेतील पहिल्या दोन आठवड्यांमधील सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.'

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडे कायम करण्यात आले आहे. त्यामुळे यावेळी तोच संघाचे कर्णधारपद सांभाळताना दिसेल. याशिवाय धोनीच्या अनुपस्थितीत संजू सॅमसन यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळताना दिसू शकतो. चेन्नईच्या सराव सामन्यादरम्यानही संजू सॅमसनने यष्टीरक्षण केले होते.

संजूला या हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्ससोबत रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांच्या बदल्यात ट्रेड करत संघात घेतलं आहे. त्याच्याकडे धोनीचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून वारसदार म्हणून पाहिले जात आहे. संजू व्यतिरिक्त चेन्नईकडे उर्विल पटेल आणि कार्तिक शर्मा हे दोन अनकॅप्ड यष्टीरक्षकांचा पर्याय उपलब्ध आहे.

IPL 2026 Marathi News: जसप्रीत बुमराह MI vs KKR सामन्यात नाही खेळणार? समोर आले मोठे अपडेट्स, CoE मध्ये झालेला दाखल धोनीची आयपीएलमधील कारकिर्द

एमएस धोनीने आयपीएलमध्ये २७८ सामने खेळताना २४ अर्धशतकांसह ५४३९ धावा केल्या आहेत. त्याने यष्टीरक्षक म्हणून २०१ बळी घेतले आहेत. यात १५४ झेल आणि ४७ यष्टीचीतचा समावेश आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.