मारेगाव: बळीराज्यात नवचैतन्य निर्माण होऊन पशुपालणाला चालना मिळण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत मारेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पशू प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळपासून बळीराजाने आपली जनावरे आणली होती. पशू प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मारेगाव तालुक्यातील १०५ गावे मिळून असलेला तालुका हा एकमेव शेती आणि शेतीपूरक व्यवसायाशी निगडित आहे. मुख्य आर्थिक स्रोत हा शेती आहे.
Vidarbha News: पीक विमा दावे वेळेत द्या !; लोकसभेत खासदार देशमुख यांची तारांकित प्रश्नाव्दारे मागणीचांगल्या पशूची संख्या वाढविणे दूध व्यवसायाला चालना मिळावी, पशुपालकाला योग्य मार्गदर्शन मिळावे यासह कुकुटपालन, शेळीपालन यातून आर्थिक स्रोत वाढून शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी या पशू, पक्षी तालुका प्रदर्शन आयोजित केले होते. यात १७० पशू, पक्षींचा समावेश होता.
Premium|Petrol Diesel Tax Cut: आपण पेट्रोल आण डिझेलवर नेमका किती कर भरतो?आठ गटामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि सात उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती पशू संवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाला पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.क्रांती काटोले, सहाय्यक उपायुक्त डॉ. राजेश चोरमोले, गटविकास अधिकारी भीमराव व्हनखंडे, सहाय्यक गट विकास अधिकारी हेमराज राठोड, शिवसेनेचे करण किंगरे, पत्रकार मोरेश्वर ठाकरे यासह मान्यवर उपस्थित होते. पशुसंवर्धन विभाग अधिकारी, कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.