दिग्रस: खासदार संजय देशमुख यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत पीक विमा दावे वेळेत मिळावेत, अशी मागणी केली. मंगळवारी (ता. २४) तारांकित प्रश्न त्यांनी शेतकर्!यांना विमा दावे मिळण्यात होणार्!या विलंबाचा मुद्दा उपस्थित करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले.
खासदार देशमुख यांनी विशेषतः शेतकर्!यांना पीक विमा दाव्यांसंदर्भात भेडसावणार्!या अडचणी अधोरेखित केल्या. राज्य सरकारकडून प्रीमियम अनुदान वेळेत न दिल्यामुळे नुकसानभरपाई उशिरा मिळत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर उत्तर देताना केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी खरीप २०२४ हंगामासाठी महाराष्ट्रात एकूण ४,७४०.५८ कोटी रुपयांच्या दाव्यांपैकी सुमारे ९९ टक्के रक्कम वितरित करण्यात आली असून केवळ एक टक्का रक्कम प्रलंबित असल्याचे सांगितले.
Vidarbha Weather: उन्हाचे चटके अन् वादळाचे सावटही; विदर्भात पुढील दोन दिवस वादळी पावसाचा यलो अलर्टयवतमाळ, वाशीम व परभणी जिल्ह्यांमध्येही सुमारे ९९.७७ टक्के दाव्यांचा निपटारा झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच राष्ट्रीय पीक विमा पोर्टल, डिजीक्लेम मॉड्यूल, अॅप आणि सॅटेलाइट आधारित तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दावे जलद व पारदर्शक पद्धतीने निकाली काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही मंत्री चौहान यांनी स्पष्ट केले.
Premium|Urban Political Economy : शहरी राजकीय अर्थकारणात महानगरांचे वर्चस्व; नागपूर आणि मुंबईचे महत्त्वदरम्यान, सरकारच्या आकडेवारीवर प्रतिक्रिया देताना खासदार देशमुख यांनी बहुतेक दावे निकाली निघाले असले, तरी प्रत्यक्षात शेतकर्!यांना वेळेत पीक विमा रक्कम मिळत नाही. त्यामुळे वेळेवर आणि पूर्ण नुकसानभरपाई मिळणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. यवतमाळ सारख्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात शेतकर्!यांना तत्काळ आर्थिक मदत मिळणे ही काळाची गरज आहे.
शेवटी, उर्वरित प्रलंबित दावे तातडीने निकाली काढावेत आणि भविष्यात पीक विमा योजनेचा लाभ शेतकर्!यांना वेळेत व पारदर्शक पद्धतीने मिळेल, याची हमी देण्याची मागणी खासदार देशमुख यांनी केंद्र व राज्य सरकारकडे केली.