उन्हाळा आला की कैरीची आंबट गोड चव आणि तिचा सुगंध प्रत्येकाला मोहात पाडतो. चटणी, लोणचे, पन्हे अशा विविध प्रकारांनी आपण कैरीचा आस्वाद घेतो. पण चविष्ट असण्याबरोबरच कैरी ही आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. विशेषतः रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कैरी उपयुक्त ठरते. कैरीमध्ये व्हिटॅमिन्स, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे शरीराला अनेक प्रकारे लाभदायक ठरतात. चला तर मग, कैरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे सविस्तर जाणून घेऊयात. (raw mango health benefits immunity boosting)
1. रोगप्रतिकार शक्ती वाढवते
कैरीमध्ये व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते, जे शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते. यामुळे सर्दी-खोकला आणि इतर संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळू शकते.
2. डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त
कैरीमध्ये असलेले पोषक घटक डोळ्यांचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करतात. नियमित सेवन केल्यास दृष्टी सुधारण्यास मदत होऊ शकते.
3. त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
कैरीमधील जीवनसत्त्वे त्वचेला नैसर्गिक चमक देतात आणि त्वचा मऊ व तजेलदार ठेवतात. तसेच केस मजबूत राहण्यास आणि त्यांचा रंग टिकवण्यासही मदत होते.
4. पचनक्रिया सुधारते
ज्यांना अॅसिडिटी, बद्धकोष्ठता किंवा अपचनाचा त्रास होतो, त्यांच्यासाठी कैरी फायदेशीर ठरते. ती पचन सुधारून पोटाच्या तक्रारी कमी करण्यास मदत करते.
5. मधुमेह नियंत्रणात मदत
मर्यादित प्रमाणात कैरीचे सेवन केल्यास शरीरातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनीही योग्य प्रमाणात कैरीचा समावेश करू शकतात.
6. लोहाची कमतरता भरून काढते
कैरीमुळे शरीरातील लोहाची पातळी सुधारण्यास मदत होते, ज्यामुळे अशक्तपणा कमी होण्यास फायदा होतो.
7. उष्णतेपासून संरक्षण
उन्हाळ्यात जास्त घाम येणे, थकवा जाणवणे अशा समस्या सामान्य असतात. अशावेळी कैरीचे पन्हे किंवा कैरी खाल्ल्यास शरीराला थंडावा मिळतो आणि उष्माघातापासून बचाव होतो.
8. रक्तशुद्धी आणि इतर फायदे
कैरीचे सेवन केल्याने रक्ताशी संबंधित विकार टाळण्यास मदत होऊ शकते. तसेच उलटी होणे किंवा अस्वस्थ वाटत असल्यास कैरी आणि मीठ घेतल्याने आराम मिळू शकतो.
सेवन करताना काय काळजी घ्यावी?
कैरी आरोग्यासाठी चांगली असली तरी ती मर्यादित प्रमाणातच खावी. जास्त प्रमाणात खाल्ल्यास अॅसिडिटी किंवा पोटदुखी होऊ शकते. तसेच स्वच्छ धुऊनच कैरीचे सेवन करणे आवश्यक आहे. कैरी ही केवळ चविष्ट फळ नाही, तर आरोग्यासाठीही एक नैसर्गिक औषध आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने कैरीचा आहारात समावेश केल्यास शरीर निरोगी ठेवण्यास आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होऊ शकते.