अंगावर खाकी वर्दी मिरवण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, पुण्यात पोलीस भरतीच्या परीक्षेत धावताना तरुणाचा मृत्यू
शिवानी पांढरे March 28, 2026 05:43 PM

पुणे: महाराष्ट्र राज्य पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या एका तरुण उमेदवाराचा  मैदानी चाचणीदरम्यान मृत्यू (Pune Police Bharti) झाल्याची हृदयद्रावक घटना पुण्यात (Pune Police Bharti) घडली आहे. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय मैदानावर शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडली. पुरुषोत्तम बारकुल (वय २३, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस भरती प्रक्रियेला गालबोट लागले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.(Pune Police Bharti)

Pune Police Bharti: नेमकी घटना काय?

पुणे शहर पोलीस दलाची भरती प्रक्रिया गेल्या महिनाभरापासून शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या (Pune Police Bharti) मैदानावर सुरू आहे. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे मैदानी चाचणीला सुरुवात झाली. पुरुषोत्तम बारकुल यानेही या प्रक्रियेत (Pune Police Bharti) सहभाग घेतला होता. पोलीस भरतीमध्ये १६०० मीटर धावण्याची चाचणी ही अत्यंत कठीण आणि शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी मानली जाते. पुरुषोत्तमने आत्मविश्वासाने धावण्यास सुरुवात केली होती. (Pune Police Bharti)

त्याने मैदानावर दोन फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण केल्या. मात्र, तिसऱ्या फेरीत धावत असताना अचानक त्याला अपस्माराचा (फिट) तीव्र झटका आला. यामुळे तो धावतानाच मैदानावर बेशुद्ध होऊन कोसळला. त्याच्यासोबत धावणाऱ्या इतर उमेदवारांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला.(Pune Police Bharti)

मैदानावर उपस्थित असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने पुरुषोत्तमकडे धाव घेतली. तेथे तैनात असलेल्या वैद्यकीय पथकाने त्याची प्राथमिक तपासणी (Pune Police Bharti) केली असता, त्याच्या हृदयाचे ठोके (Pune Police Bharti) अत्यंत मंद झाल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याला तातडीने पोलीस वाहनातून ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. ससूनमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी त्याला 'मृत घोषित' केले.(Pune Police Bharti)

Pune Police Bharti: कुटुंबाचा आधार हरपला

पुरुषोत्तम हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील रहिवासी होता. अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे येत, त्याने पोलीस होण्यासाठी जिद्दीने (Pune Police Bharti) तयारी केली होती. पहाटे उठून सराव करणे आणि मैदानी चाचणीसाठी स्वतःला झोकून देणे, हे त्याचे रोजचे काम होते. मात्र, ज्या खाकी वर्दीचे स्वप्न त्याने पाहिले होते, ती वर्दी मिळवण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला.(Pune Police Bharti)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.