Mobile Storage Tricks : सतत मोबाईलचं स्टोरेज फुल्ल होतंय? फ्रीमध्ये मिळेल जास्त स्पेस, एकदा वापरुन तर बघा 'ही' १ सोपी ट्रिक
esakal March 29, 2026 06:45 PM
१. कॅशे डेटा आणि 'हिडन' फाइल्स क्लीन करा


मोबाईलमधील अनेक ॲप्स वापरताना मोठ्या प्रमाणावर 'कॅशे' (Cache) डेटा साठवून ठेवतात, जो कालांतराने अनेक GB जागा व्यापतो. तुमच्या फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन 'Storage' सेक्शनमधून हा डेटा वेळोवेळी क्लिअर करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त व्हॉट्सॲपवरील अनावश्यक 'Data' आणि 'Sent' फोल्डरमधील फोटो-व्हिडिओ डिलीट केल्यास मोठी स्पेस मोकळी होऊ शकते. बऱ्याचदा आपण डिलीट केलेले फोटो 'Trash' किंवा 'Bin' मध्ये ३० दिवसांपर्यंत पडून असतात तेथूनही ते कायमचे डिलीट करणे गरजेचे आहे.

२. क्लाउड स्टोरेजचा स्मार्ट वापर करा


मोबाईल मेमरी वाचवण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे क्लाउड स्टोरेज. गुगल फोटोज (Google Photos) मधील 'Free up space' हे फिचर वापरून तुम्ही बॅकअप घेतलेले फोटो फोनमधून डिलीट करू शकता. याशिवाय टेलिग्राम (Telegram) सारख्या ॲपचा वापर तुम्ही वैयक्तिक क्लाउड म्हणून करू शकता जिथे तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आणि फाइल्स सुरक्षित राहतील आणि फोनवर भार पडणार नाही. टेराबॉक्स (TeraBox) सारखे ॲप्स 1 TB पर्यंत मोफत क्लाउड स्पेस देतात ज्याचा वापर मोठ्या फाईल्स साठवण्यासाठी करता येईल.

Call Scams : जर तुमच्या मोबाईलवर येत आहे सायलेंट फोन; तर सावध व्हा, नवा AI फ्रॉड करेल बँक खाते रिकामे, पाहा सुरक्षित कसे राहाल ३. डुप्लिकेट फाईल्स आणि 'लाईट' ॲप्सची निवड


आपल्या फोनमध्ये अनेकदा एकाच फोटोचे किंवा फाईलचे अनेक Duplicates असतात. यासाठी 'Files by Google' सारखे ॲप वापरून तुम्ही सहजपणे डुप्लिकेट्स शोधून ते डिलीट करू शकता. तसेच फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा मेसेंजर यांसारख्या अवजड ॲप्सऐवजी त्यांचे Lite व्हर्जन वापरावे. हे ॲप्स कमी जागा व्यापतात आणि रॅमवरही जास्त ताण देत नाहीत ज्यामुळे मोबाईल हँग होण्याची समस्या देखील दूर होते.

AI Courses : घरबसल्या फ्रीमध्ये शिका AI अन् मिळवा लाखोंची नोकरी, सरकारकडून १५,००० स्कॉलरशिप, काय योजना आहे पाहा ४. वेब ब्राऊझर आणि ऑटो डाऊनलोड सेटिंग


अनेकदा सोशल मीडिया ॲप्सवर येणारे फोटो आणि व्हिडिओ आपोआप डाऊनलोड होतात, ज्यामुळे स्टोरेज झपाट्याने भरते. व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या सेटिंग्समध्ये जाऊन Media Auto download बंद करा जेणेकरून तुम्हाला हवे असलेलेच फोटो डाऊनलोड होतील. तसेच, क्रोम ब्राऊझरमधील जुन्या डाऊनलोड फाइल्स आणि कुकीज वेळोवेळी साफ केल्यानेही मोठी स्पेस मोकळी मिळते. या छोट्या पण प्रभावी उपायांनी तुमचा फोन पुन्हा नवीन सारखा स्पीडने चालू लागेल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.