MI vs KKR Live : रायन रिकल्टनच्या ८१ धावा, रोहित शर्माच्या ७८... तरीही प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्कार तिसऱ्यालाच; जाणून घ्या का?
esakal March 30, 2026 04:45 AM

Why Shardul Thakur won player of the match MI vs KKR IPL 2026? मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये विजयी सलामी दिली. २०१२ नंतर मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल हंगामातील पहिला सामना जिंकण्यात रविवारी यशस्वी ठरला. रोहित शर्मा व रायन रिकल्टन यांनी जोरदार फटकेबाजी करून कोलकाता नाइट रायडर्सचे २२१ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. हा MI चा आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला. त्यामुळे रोहित किंवा रिकल्टन यांच्यापैकी एकाला प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्कार मिळेल, असा अंदाज होता. पण, तसं नाही झालं...

मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये सहाव्यांदा २०० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. या विक्रमात पंजाब किंग्स ( ८) मुंबईच्या पुढे आहे. राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी प्रत्येकी ४ वेळा हा पराक्रम केला आहे. एकाच खेळपट्टीवर एकाच प्रतिस्पर्धीवर सर्वाधिक विजयाच्या बाबतीत मुंबई इंडियन्सने बाजी मारली आहे. त्यांनी वानखेडे स्टेडियमवर ११ वेळा कोलकाताला पराभूत केले आहे.

IPL 2026 POINTS TABLE: मुंबई इंडियन्सने RCB पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला, तरीही गुणतालिकेत मागे कसे? जाणून घ्या गणित

मुंबई इंडियन्सचा हा आयपीएलमधील कोलकातावरील २५ वा ( ३६ सामने) विजय ठरला आणि एका प्रतिस्पर्धीविरुद्धची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. KKR ने ४ बाद २२० धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेने ६७, अंगकृश रघुवंशीने ५१ धावांची खेळी केली. त्याला फिन अॅलन ( ३७) व रिंकू सिंग ( नाबाद ३३) यांची साथ मिळाली. फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर शार्दूल ठाकूरने ३ विकेट्स घेत KKR च्या धावगतीला लगाम लावला आणि त्यामुळे त्याला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार दिला गेला.

शार्दूल ठाकूर म्हणाला, मला आव्हाने स्वीकारायला आवडतात आणि आज अशीच एक आव्हानात्मक परिस्थिती होती, ज्यामध्ये मला गोलंदाजी करावी लागली. विशेषतः सहाव्या षटकात. आव्हानांनीच मला आज इथपर्यंत घडवले आहे आणि मला त्याचा आनंद मिळतो. त्यामुळे मला वाटते की, आजची कामगिरी ही अशाच एका आव्हानात्मक प्रसंगातील होती. या मैदानावर माझ्या सुखद आणि कटू अशा दोन्ही प्रकारच्या आठवणी आहेत. मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी इथे येणे आणि तेही आपल्या घरच्या मैदानावर खेळणे, ही खरोखरच एक विशेष गोष्ट आहे.

MI vs KKR Toss Fixing? मुंबई इंडियन्सवर 'फिक्सिंग'चा आरोप, टॉसच्या वेळी हार्दिकने काय केले पाहा; नेटकऱ्यांनी घेतली शाळा Video Viral

लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने ३८ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकार खेचून ७८ धावांच्या खेळीसह रायन रिकल्टनसह पहिल्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी केली. रिकल्टन ४३ चेंडूंत ४ चौकार व ८ षटकारांसह ८१ धावांवर रन आऊट झाला. मुंबईने १९.१ षटकांत ४ बाद २२४ धावा करून सामना जिंकला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.